Advertisement

शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळा- अनिल बोरनारे

इयत्ता १० वी १२ वी चे परीक्षक व नियामक (मॉडरेटर) असणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची मागणी सोमवारी भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली.

शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळा- अनिल बोरनारे
SHARES

इयत्ता १० वी १२ वी चे परीक्षक व नियामक (मॉडरेटर) असणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची मागणी सोमवारी भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली. यासंदर्भात त्यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन एक निवेदन सादर केलं.


निवडणुकीचं काम नको

भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचे मुंबई व कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे आणि दक्षिण मध्य मुंबईचे संयोजक सचिन पांडे यांनी मंत्रालयात मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार आणि सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दहावीच्या शिक्षकांना तसंच आजारी आणि दिव्यांग शिक्षकांना निवडणुकीची कामं देऊ नये यासाठी निवेदन दिलं.


मोठ्या संख्येने फक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाच निवडणुकीची कामं दिली जातात. त्यामुळे शाळांचं काम ठप्प होतं. मुंबईतील केंद्र आणि राज्य शासनाच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांना कामं दिल्यास शिक्षकांवरील कामाचा बोजा हलका होऊ शकतो. याबाबतीत निवडणूक आयोगाने कार्यवाही करावी, असं बोरनारे यांनी यावेळी सांगितलं. याबाबत आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचं आश्वासन निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं.


हेही वाचा - 

१ जागा ३ इच्छुक; उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी काँग्रेसमध्ये चढाओढ

कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा