Advertisement

आमदारांना यंत्र, मनुष्यबळ पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी


आमदारांना यंत्र, मनुष्यबळ पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी
SHARES

अंधेरी पश्चिम येथील म्हाडाच्या एका भूखंडावरील दगड मातीचा भराव उचलून त्या ठिकाणी राबवलेल्या स्वच्छता मोहिमेला महापालिकेकडून मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपलब्ध करून देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश स्थायी समितीने दिले आहेत.


पालिकेची स्थानिक आमदाराला मदत?

अंधेरी पश्चिम येथील म्हाडाच्या एका भूखंडावर असलेल्या दगड विटांचा भराव काढून तो साफ करण्यासाठी म्हाडा आणि महापालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही आपल्याला मदत न करणाऱ्या महापलिकेने स्थानिक आमदाराला यासाठी मदत केल्याचा आरोप शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविक राजुल पटेल यांनी केला. या ठिकाणचा दगड विटांचा भराव हटवण्यासाठी आपण केलेल्या पत्रव्यवहारानंतर म्हाडाने 'याचे पैसे भरले तरच ते काढले जाईल', असे उत्तर दिले. परंतु, याच भूखंडावरील हाच भराव काढण्यासाठी महापालिकेचे कामगार-कर्मचारी आणि यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली. प्रशासनाच्या अशा अधिकाऱ्यांमुळे आम्हा नगरसेवकांना अपमानित व्हावे लागते, अशा शब्दांत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.



'जाब विचारला म्हणून पोलिस तक्रार'

मात्र, 'याचाच जाब विचारला म्हणून आपल्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. त्यामुळे ज्या कोणी अधिकाऱ्याने या कर्मचाऱ्यांना पाठवले, त्यांची चौकशी करण्यात यावी', अशी मागणी राजुल पटेल यांनी केली आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी पाठिंबा देत 'सध्या भाजपाच्या डोक्यावर अच्छे दिनचे भूत नाचत आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या कामांमध्ये हस्तक्षेप आमदार व खासदारांकडून होत आहे. परिणामी नगरसेवक, आमदार आणि खासदारांमध्ये संघर्ष निर्माण होत आहे' असे सांगितले.


'डेब्रिज उचलला तर चूक काय?'

सपाचे गटनेते रईस शेख यांनी 'ज्याप्रमाणे शिवसेना काँग्रेस सरकारविरोधात आक्रमक झाली होती, तशी या अच्छे दिन म्हणणाऱ्यांविरोधात आक्रमक व्हावे', अशी सूचना केली. त्यावर भाजपाच्या अलका केरकर यांनी, 'आमदारांनी जर म्हाडाच्या भूखंडावरील डेब्रिज उचलले तर काय चूक केली?' असा सवाल केला.



हेही वाचा

हिंदमाता परिसरात पाणी तुंबणारच! महापालिकेच्या अधिकाऱ्याचीच कबुली


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा