Advertisement

शासकीय अधिकारी कर्मचारी जाणार संपावर


शासकीय अधिकारी कर्मचारी जाणार संपावर
SHARES

मुंबई - राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी येत्या 18 ते 20 जानेवारीला संप पुकारणार आहेत. विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. राज्यातील विविध खात्यातील 1 लाख 20 हजार राजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी या संपात सहभागी होतील. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य शासनाच्या वेळकाढू धोरणाबाबत तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात आली. 

काय आहेत प्रमुख मागण्या -

  • सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून त्वरीत लागू करणे
  • पाच दिवसांचा आठवडा करणे
  • सेवानिवृत्तीचं वय 60 वर्षे करणे
  • दोन वर्षांची बालसंगोपन रजा
  • सर्व रिक्त पदे मर्यादित वेळेत भरणे
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा