सुपर एक्स्प्रेस वेनं उघडला शिक्षणाचा महामार्ग

  Pali Hill
  सुपर एक्स्प्रेस वेनं उघडला शिक्षणाचा महामार्ग
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेस वे प्रकल्पातील विस्थापितांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग आता सुकर होणार आहे. या प्रकल्पातील विस्थापितांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी उचलण्यास राज्य सरकारनं तयारी दर्शवल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ता विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी मुंबई लाईव्हला दिली. विस्थापितांना मोबदला म्हणून रक्कम, जमीन, घर आणि नोकरी दिली जातो. पण या प्रकल्पातील विस्थापितांनी मात्र याबरोबरच आपल्या मुलांना मोफत उच्च शिक्षण मिळावं, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. ती राज्य सरकारनं मान्य केल्याचं मोपलवार यांनी सांगितलं. त्यामुळे आता विस्थापितांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची योजना कशी राबवायची, हे लवकरात लवकर ठरवण्यात येणार असल्याचं मोपलवार यांनी स्पष्ट केलंय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.