Advertisement

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील अपघातात अनेकांचा मृत्यू, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

आग काही प्रमाणात नियंत्रित केली होती. पण पुन्हा एकदा आग धुमसायला लागली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील अपघातात अनेकांचा मृत्यू, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
SHARES

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळ टँकर पलटी झाल्याने घटनास्थळी भीषण आग लागली आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, अचानक टँकरचे नियंत्रण सुटले आणि तो उलटला, त्यानंतर रस्त्यावर भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. आग काही प्रमाणात नियंत्रित केली होती. पण पुन्हा एकदा आग धुमसायला लागली आहे. त्यामुळे वाहतूक पुन्हा थांबवली आहे. 

गृहमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला शोक

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून या भीषण आगीच्या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. चार मृतांना श्रद्धांजली वाहताना त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, तीन जखमींवर उपचार सुरू असून राज्य पोलिस, महामार्ग पोलिस, आयएनएस शिवाजी आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी उपस्थित आहेत. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली असून एकेरी वाहतूक सुरू झाली असून लवकरच दुसऱ्या बाजूची वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई महामार्गावरील खंडाळा घाटात असलेल्या कुणे पुलावर हा भीषण अपघात झाला. केमिकल घेऊन जाणारा टँकर उलटला आणि टँकरने पेट घेतला.

या अपघातानंतर घटना टँकरमध्ये भरलेले तेल रस्त्यावर पसरले आहे.  काही वेळातच आग पुलाखालीही पसरली.

त्याचवेळी केमिकलमुळे दुचाकीस्वारही रस्त्यावर पडला. या दुचाकीस्वाराचा 12 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात महिला गंभीररीत्या भाजली आहे. या अपघातात टँकर चालकाचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत.

या अपघातानंतर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूकही ठप्प झाली आहे. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. यासोबतच एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याने लोणावळा शहरातून वाहतूक वळवण्यात येत आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा