Advertisement

राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य पोलिस दलातील अपर पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस दलातील अपर पोलिस आयुक्तांच्या मंगळवारी अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. मंगळवारी गृहविभागाने यासंबंधीचे आदेश दिले.

राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
SHARES

राज्य पोलिस दलातील अपर पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस दलातील अपर पोलिस आयुक्तांच्या मंगळवारी अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. मंगळवारी गृहविभागाने यासंबंधी आदेश दिले. 


कमलाकर धोरण विभागात

नियोजन न समन्वय विभागाचे अपर पोलीस महासंचालक धनंजय कमलाकर यांची धोरण विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी एस. जगन्नाथन हे त्या विभागाचा कार्यभार सांभाळणार आहेत. तसंच राज्याच्या विशेष कृती दलाच्या अपर महासंचालकपदी राजेंद्र सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पडवळ यांच्याकडे वाहतूक विभागाच्या अपर पोलीस आयुक्तपदीचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यांच्या जागी निशित मिश्रा दक्षिण प्रादेशिक विभागाचा कार्यभार सांभाळतील. तर अपर पोलिस आयुक्तपदी वाहतूक विभागाच्या विरेश प्रभू यांची यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मध्य प्रादेशिक विभागाचे रवींद्र शिसवे यांच्याकडे संरक्षण व सुरक्षा विभागाचा पदभार सोपवण्यात आला आहे. 



हेही वाचा -

आता पोलिस ठाण्यातही भरणार जनता दरबार

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी 'रेल सुरक्षा' मोबाइल अॅपची निर्मिती



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा