Advertisement

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी 'रेल सुरक्षा' मोबाइल अॅपची निर्मिती

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी खुशखबर आहे. कारण आता प्रवाशांना लोकलमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास त्याची ऑनलाईन तक्रार करता येणार आहे. पश्चिम रेल्वेनं प्रवाशांसाठी 'रेल सुरक्षा' या मोबाईल अॅपची निर्मिती केली आहे.

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी 'रेल सुरक्षा' मोबाइल अॅपची निर्मिती
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी खुशखबर आहे. कारण आता प्रवाशांना लोकलमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास त्याची ऑनलाईन तक्रार करता येणार आहे. पश्चिम रेल्वेनं प्रवाशांसाठी 'रेल सुरक्षा' या मोबाईल अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना धावत्या लोकलमध्ये एखादी प्रसंग घडल्यास त्याची ऑनलाईन तक्राक दाखल करता येणार आहे. 'रेल्वे सुरक्षा' हे मोबाईल अॅप पुणे येथील शौर्य तंत्रज्ञानाच्या कंपनीने बनवले आहे.


ऑनलाइन तक्रार

लोकलमधून प्रवास करत असताना अनेकदा प्रवासादरम्यान प्रवाशांची गैरसोय होते. लोकलमध्ये आपत्कालीन प्रसंग अथवा दुर्घटना घडल्यास प्रवाशांना पुढच्या स्थानकात उतरून याबाबत तक्रार दाखल करावी लागते. मात्र या रेल्वे सुरक्षा अॅपमुळे तातडीने ऑनलाइन तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.


'रेल सुरक्षा' मोबाइल अॅप

पश्चिम रेल्वेवरील तब्बल ३५ लाख प्रवाशांसाठी 'रेल सुरक्षा' मोबाइल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, सद्यस्थितीत या अॅपची चाचणी सुरू अाहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर हे अॅप प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. या अॅपमध्ये प्रवाशांना तक्रार नोंदवण्यासोबत स्थानक माहिती आणि हेल्प असे पर्याय देण्यात आले आहेत. स्थानक माहितीअंतर्गत संबंधित रेल्वे स्थानकातील आरपीएफ ठाण्यातील दूरध्वनी क्रमांक, स्थानक निरीक्षकाचा मोबाइल क्रमांक, स्थानक व्यवस्थापकाचा मोबाइल क्रमांक, स्थानकाजवळील पोलिस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक, स्थानकातील रेल्वे पोलिसांचा दूरध्वनी क्रमांक, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि क्रेन सुविधा यांचा क्रमांक प्रवाशांना देण्यात आला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा