आता पोलिस ठाण्यातही भरणार जनता दरबार

मुंबई पोलिस आयुक्तांनी स्थानिक पोलिस ठाण्यांना दररोज ३ ते ५ जनता दरबार घेण्याच्या सूचना सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसंच वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या कार्यालयाबाहेर नागरिकांना भेटण्यासाठीच्या वेळेची पाटी लावण्याचे आदेशही मुंबई पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.

SHARE

सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्यासाठी व त्यांच्या छोट्या-मोठ्या समस्या जागेवरच दूर करण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांनी स्थानिक पोलिस ठाण्यांना दररोज ३ ते ५ जनता दरबार घेण्याच्या सूचना सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसंच वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या कार्यालयाबाहेर नागरिकांना भेटण्यासाठीच्या वेळेची पाटी लावण्याचे आदेशही मुंबई पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे रविवार सोडून उर्वरित वाराला दररोज ३ ते ५ सर्व पोलिस ठाण्यात जनता दरबार भरणार आहे.


आरोपीप्रमाणे वागणूक

शहरातील नागरिकांसाठी गुन्हेगारीमुक्त आणि सुरक्षित वातावरण निर्माण करत कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी स्थानिक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवर असते. मात्र एखादी अनुचित घटना घडल्यावरही अनेक जण पोलिस ठाण्यात जाण्यासाठी कचरतात. कारण पोलिसांकडून तक्रारदाराला आरोपीप्रमाणे वागणूक दिल्याचा अनुभव काही नागरिकांना अजूनही येतो.


भेटीसाठी गाऱ्हाण

अनेकदा गाऱ्हाणं घेऊन गेलेल्या नागरिकांना वरिष्ठ जागेवर मिळत नाहीत. तर कधी साहेब रात्रपाळी करून आले असून झोपले असल्याचं त्यांच्या आॅडर्लीकडून सांगत नागरिकांना केबिनबाहेर ताटकळत ठेवलं जातं. काही तासानंतर वरिष्ठ समोर आले तरी ते स्टेशन हाऊसच्या अधिकाऱ्यांना भेटा असे सांगून निघून जातात. त्यामुळे हताश नागरिक पोलिस ठाण्यातून काढता पाय घेतात. यामुळे जनसामान्यांमध्ये पोलिसांबद्दल आत्मविश्वास आणि आपुलकीची भावना रहात नाही.


कार्यालयाबाहेर पाटील

त्यामुळेच बदलत्या काळाप्रमाणे स्मार्ट आणि सोशल पोलिसिंगचे प्रयोग राबवण्यास सुरूवात करण्याचे आदेश मुंबई पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. जनसामान्यांमध्ये पोलिसांबद्दल आत्मविश्वास आणि आपुलकी वाढवण्यासाठी मुंबईतल्या ९४ पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना दुपारी ३ ते ५ या वेळेत नागरिकांना भेटण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. तशी पाटीच आयुक्तांनी वरिष्ठांना आपल्या कार्यालयाबाहेर लावण्याचे आदेश दिले आहेत.


कायद्याचं पाठबळ

त्यामुळे यापुढे आपल्या तक्रारी थेट पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या जनता दरबारात नागरिकांना मांडता येणार आहेत. कायद्यानुसार प्रत्येक शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या कामाबद्दल कोणाकडे जावे, किती दिवसात त्यांचे काम पूर्ण होईल, काम पूर्ण न झाल्यास तक्रार कोणाकडे करायची, अशा स्वरूपाची माहिती म्हणजेच ‘नागरिकाची सनद’ प्रत्येक कार्यालयात लावणं बंधनकारक आहे. या निर्णयामुळे तक्रारदारांना पाठबळ मिळणार आहे.हेही वाचा-

चक्रे फिरली, पोलिसांची ८ तासांची ड्युटी पुन्हा १२ तासांवर

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी संजय बर्वे; तर राज्याच्या महासंचालकपदी सुबोधकुमार जयस्वालसंबंधित विषय
ताज्या बातम्या