मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी संजय बर्वे; तर राज्याच्या महासंचालकपदी सुबोधकुमार जयस्वाल

१९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले संजय बर्वे यांची ओळख अत्यंत हुशार आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून आहे. गुप्तचर विभागाचे प्रमुख असताना पालघर पोट निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची अटीतटीच्या लढाईत भाजप विजयी होणार असल्याचा अचूक अहवाल त्यांनी सादर केला होता. प्रत्यक्षात हा अहवाल खराही ठरला.

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी संजय बर्वे; तर राज्याच्या महासंचालकपदी सुबोधकुमार जयस्वाल
SHARES

राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांचा कार्यकाल पूर्ण होत असून त्यांच्या जागी मुंबई पोलिस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांना बढती देण्यात आली आहे. तर मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  पडसलगीकर यांच्या मुदतवाढीला केंद्राने नकार दिल्यानंतर  मुंबईचे पोलिस आयुक्त जयस्वाल यांची महासंचालकपदावर नियुक्ती होणं निश्चीत होतं. त्यामुळे मुंबई पोलिस आयुक्तपदासाठी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू होती. 


हुशार, शिस्तप्रिय अधिकारी 

राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर केंद्राने तिसऱ्यांदा मुदतवाढीचा प्रस्ताव फेटाळला. गुरूवारी पडसलगीकर हे निवृत्त होणार असून महासंचालक पदाची सूत्रे आता मुंबई पोलिस आयुक्त सुबोधकुमार जैयस्वाल यांच्या हातात दिली गेली आहेत. जयस्वाल यांचा उत्तराधिकारी म्हणून मुंबई पोलिस आयुक्तपदी संजय बर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले संजय बर्वे यांची ओळख अत्यंत हुशार आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून आहे. गुप्तचर विभागाचे प्रमुख असताना पालघर पोट निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची अटीतटीच्या लढाईत भाजप विजयी होणार असल्याचा अचूक अहवाल त्यांनी सादर केला होता. प्रत्यक्षात हा अहवाल खराही ठरल्याने बर्वे यांनी मुख्यमंत्र्यांच्या मनात घर केले होते. 


अवघे सहा महिने

संजय बर्वे यांच्याकडे मुंबई पोलिस आयुक्त पदाची धुरा अवघे सहा महिने राहणार आहे.  ३० आॅगस्ट  २०१९ ला बर्वे निवृत्त होणार आहेत. मात्र, राज्यातील विधानसभा निवडणूका लक्षात घेता बर्वे यांना आणखी मुदतवाढ दिली जाऊ शकते. 



हेही वाचा

लाच घेणाऱ्या पोलिसांवर थेट ‘बडतर्फ’ची कारवाई




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा