महाराष्ट्रात (maharashtra) "पाळणा योजना" (palna yojna) सुरू केली जात आहे, जी राज्यातील काम करणाऱ्या महिलांच्या जीवनाला नवीन चालना देईल आणि त्यांच्या लहान मुलांसाठी सुरक्षित आणि संगोपनाचे वातावरण प्रदान करेल. काम करणाऱ्या मातांच्या मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी या योजनेद्वारे सरकार घेणार.
ही योजना महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे (aditi tatkare) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जाईल. पहिल्या टप्प्यात, राज्यभरात 345 डेकेअर सेंटर सुरू केले जातील. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुक्रमे 60:40 च्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल.
केंद्र सरकारने 29 फेब्रुवारी 2024 रोजी याला मान्यता दिली आहे आणि राज्य सरकारच्या 13 ऑक्टोबर 2024 च्या निर्णयानुसार ही योजना लागू होईल.
योजनेची वैशिष्ट्ये
पद्धत
मानधन/भत्ते
मुलांना पोषक वातावरण मिळेल
महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, "या योजनेमुळे मातांना रोजगार सहज मिळेल आणि मुलांना सुरक्षित, शिक्षणाभिमुख आणि पोषक वातावरण मिळेल. हा उपक्रम प्रत्येक आईसाठी दिलासा देणारा आणि प्रत्येक मुलाच्या भविष्याची हमी देणारा ठरेल."
हेही वाचा