एेन दिवाळीत कुर्ल्यात अंधार

 Chembur
एेन दिवाळीत कुर्ल्यात अंधार
एेन दिवाळीत कुर्ल्यात अंधार
एेन दिवाळीत कुर्ल्यात अंधार
See all

कुर्ला - गेल्या महिनाभरापासून कुर्ला पूर्व परिसरातील रस्त्यावरील दिवे बंद आहेत. त्यामुळं पादचाऱ्यांना मोठाच मनस्ताप सहन करावा लागतो आहे. याचाच फायदा पाकिटमार घेत आहेत. रिक्षा स्टॅन्ड परिसरात अंधार असल्यानं अनेक पाकिटमार रांगेत उभं राहून महिलांच्या पर्स गायब करत आहेत. काही महिन्यांपूर्वीच पालिकेनं इथल्या पोलीस बीट चौकीजवळ हायमस्ट लाइटचा टॉवर उभा केला आहे. मात्र तो आद्यापही सुरू न झाल्यानं या परिसरातला अंधार कायम आहे. त्यामुळं पालिकेनं तात्काळ या रस्त्यांवरील दिवे सुरू करावेत, अशी मागणी येथील स्थानिक दुकानदार सय्यद इजाज यांनी केली आहे.

Loading Comments