Advertisement

बदलापूरमध्ये ७ दिवसांचा कडक लाॅकडाऊन!

मुंबईनजीक असलेल्या बदलापूर शहरातील कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन कुळगाव-बदलापूर परिषद प्रशासनाने शहरात ७ दिवसांकरीता कडक लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय गुरूवारी घेतला आहे.

बदलापूरमध्ये ७ दिवसांचा कडक लाॅकडाऊन!
SHARES

मुंबईनजीक असलेल्या बदलापूर शहरातील कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन कुळगाव-बदलापूर परिषद प्रशासनाने शहरात ७ दिवसांकरीता कडक लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय गुरूवारी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शनिवार ८ मे पासून करण्यात येणार आहे. 

बदलापूरमध्ये आतापर्यंत एकूण १९१८० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यापैकी १७५९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर शहरातील २०९ जणांचा आतापर्यंत कोरोनाने बळी घेतलेला आहे. शहरात ५ मे रोजी पर्यंत १३८१ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत बदलापूरमधील मर्यादीत आरोग्य व्यवस्था लक्षात घेता, कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यास आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडू शकतो. 

हेही वाचा- सर्वोच्च न्यायालयाकडून महापालिकेचं कौतुक, भाजप मात्र विरोधाचीच ढोलकी बडवतंय- महापौर

सद्यस्थितीत लाॅकडाऊन लावण्यात आलेलं असलं, तरी मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला अडचणी येत आहेत. त्यामुळे शहरात कडक लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

या काळात अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडण्यास सर्वसामान्यांना मज्जाव करण्यात येणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकानेच या काळात सुरू राहतील. निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं म्हटलं जात आहे. 

शनिवारपासून पुढील ७ दिवस हा लाॅकडाऊन कायम असणार आहे. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन लाॅकडाऊन वाढवायचा की नाही हे ठरवण्यात येईल. आतापर्यंत सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात देखील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ८ ते १० दिवसांचा लाॅकडाऊन लागू करण्यात आलेला आहे.

हेही वाचा- मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर मिळणार ऑक्सिजन, मध्य रेल्वे उभारणार ‘ऑक्सिजन पार्लर’

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा