Advertisement

महापालिकेच्या रुग्णालयांना स्वस्त दरात भाज्यांचा पुरवठा

महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांसाठी म्हणून पुरविण्यात येणाऱ्या भाज्याफळांच्या दरांसाठी सादर केलेल्या निविदेत स्वस्ताई अवतरली आहे.

महापालिकेच्या रुग्णालयांना स्वस्त दरात भाज्यांचा पुरवठा
SHARES

महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांसाठी म्हणून पुरविण्यात येणाऱ्या भाज्याफळांच्या दरांसाठी सादर केलेल्या निविदेत स्वस्ताई अवतरली आहे. महापालिकेच्या रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना उपचाराप्रमाणेच सकस आहार मिळण्यासाठी फळे, भाज्यांचाही पुरवठा केला जातो. त्यासाठी पालिकेने मागविलेल्या निविदांपैकी भाजी, फळांसाठी प्रत्येकी एक-एक कंत्राटदाराच्या निविदांना अनुकूलता दर्शविली आहे.

बाजारात भाज्या, फळे, धान्यांचे भाव वाढलेले असले तरी महापालिकेच्या रुग्णालयांना मात्र अतिशय स्वस्तात भाज्या देणारे कंत्राटदार पुढे येत आहेत. यावरून महापालिका प्रशासनावर नेहमी टीका होते. शिवाय याआधी स्वस्तात भाजी देणाऱ्या कंत्राटदाराचा प्रस्ताव मार्च महिन्यात स्थायी समितीनं फेटाळून लावल्यानंतर आता पुन्हा एकदा रुग्णालयांना भाजी पुरवण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

कांदा १५ रुपये ९९ पैसे किलो, भोपळा ५ रुपये ८४ पैसे, तर गवार १८ रुपये किलो दराने पालिके च्या रुग्णालयातील जेवणासाठी पुरवण्याची तयारी कंत्राटदारांनी दाखवली आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. रुग्णालयातील रुग्णांच्या जेवणासाठी महानगरपालिका १ लाख ११ हजार रुपयांचा भाजीपाला खरेदी करणार आहे.

मात्र, कंत्राटदारांने ज्या दरात भाजीपाला पुरविण्याची तयारी दाखवली त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रुग्णालयांना स्वस्तात भाजीपाला, कडधान्ये पुरवण्यास कंत्राटदार तयार होतात व अशा कंत्राटदारांना कामे दिल्यानंतर प्रत्यक्षात भाज्यांचा दर्जा कसा असेल याबाबत नेहमी नगरसेवक प्रश्न उपस्थित करतात.

यापूर्वी झालेल्या खरेदीच्या तुलनेने हा दर किलोमागे २६ पैसे ते ८ रुपयांपर्यंत जास्त आहे. हा दर रास्त असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या भाजीपाल्याच्या पुरवठ्यासाठी महापालिकेनं २ कंत्राटदारांची शिफारस केली आहे. हजारो किलोमध्ये ही खरेदी करावी लागते. त्यामुळे हा दर पुरवठादारांना परवडतो, असा दावा पालिका प्रशासनातर्फे  करण्यात येतो.

भाजीपाल्याचे किलोचे दर

कांदा   १५ रुपये ९९ पैसे

भोपळा  ५ रुपये ८४ पैसे

गवार   १८ रुपये

फ्लॉवर १३ रुपये ९५ पैसे

काकडी  ८ रुपये ९१ पैसे

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा