Advertisement

मुंबईकरांसाठी पालिकेची १,१६८ सामुदायिक शौचालयं

उघड्यावर शौच करणाऱ्यांना कारवाईचा बडगा दाखविण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आहे.

मुंबईकरांसाठी पालिकेची १,१६८ सामुदायिक शौचालयं
SHARES

मुंबईमध्ये ७ हजार २१२ शौचालयांमध्ये ८७ हजार ४२२ शौचकुपं वापरात आहेत. तर हगणदारीमुक्‍त मुंबईसाठी मुंबई महापालिका १ हजार १६८ सामुदायिक शौचालयं बांधणार आहे. उघड्यावर शौच करणाऱ्यांना कारवाईचा बडगा दाखविण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आहे. उघड्यावर शौच करणाऱ्या लोकांना १०० रुपये दंड करण्यात आला.

क्लीनअप मार्शलमार्फत ही कारवाई करण्यात आली. बैठका, पथनाट्य अशा विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली, मात्र मुंबई अद्याप हगणदारीमुक्त झाली नसल्याचं चित्र आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मुंबई शहर हगणदारीमुक्‍त करण्यासाठी वस्‍ती स्‍वच्‍छता कार्यक्रम विभागामार्फत एकूण १ हजार १६८ सामुदायिक शौचालयांमध्ये २२ हजार ७७४ शौचकुपे बांधणे प्रस्तावित आहेत. त्यापैकी १३९ सामुदायिक शौचालयांमध्ये २ हजार ८२० शौचकुपं बांधून पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच ५७७ सामुदायिक शौचालयांमध्ये १३,९९८ शौचकुपं बांधण्याचं काम प्रगतीपथावर आहे.

  • सार्वजनिक शौचालयातील ४ पैकी केवळ १ शौचालय स्त्रियांसाठी असे प्रमाण २०१८मध्ये दिसून आले.
  • १००-४०० पुरुषांसाठी १ आणि १००-२०० महिलांसाठी १ या प्रमाणात शौचालये पाहिजेत.
  • एका सार्वजनिक शौचालयाचा वापर ६९६ पुरुष करतात.
  • एका शौचालयाचा वापर १ हजार ७६९ महिला करतात.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा