Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
41,102
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

Coronavirus Update: म्हणून कोरोना बळीचा अंत्यविधी पत्नी, मुलाशिवाय...


Coronavirus Update: म्हणून कोरोना बळीचा अंत्यविधी पत्नी, मुलाशिवाय...
SHARES

मुंबईत राहणाऱ्या कोरोनाग्रस्त (Coronavirus) व्यक्तीचा मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला. कोरोनाने घेतलेला हा राज्यातील पहिला तर देशातील दुसरा बळी ठरला. या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारने (maharashtra government) आणखी कडक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे. कोरोनाने दगावलेल्या या व्यक्तीवर नुकतेच अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु या अंत्यसंस्काराला त्याची पत्नी आणि मुलगा उपस्थित राहू शकले नाहीत. 

महाराष्ट्रातील कोरोनाबाधीत (COVID-19) रुग्णांची संख्या आता ४२ वर जाऊन पोहोचली आहे. 

हेही वाचा- Corona Virus: नव्याने भरती होणाऱ्या प्रत्येकआरोपीचे स्क्रिनिंग करावे – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबईत राहणारी ही ६३ वर्षीय व्यक्ती दुबईहून (dubai) ५ मार्चला मुंबईत परतले होते. ७ मार्चला त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांना हृदयविकार असल्याने कुटुंबीयांनी त्यांना माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात ८ मार्चला उपचारासाठी दाखल केलं होतं. तोपर्यंत त्यांनी आपण दुबईहून परतल्याचं डाॅक्टारांपासून लपवून ठेवलं होतं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या तपासण्यांमध्ये विषाणू संसर्गामुळे (coronavirus patient) त्यांना श्वसनास त्रास होत असल्याचा संशय आल्याने त्यांचे नमुने १२ मार्चला कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथं झालेल्या चाचण्यांमध्ये या व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झालं. त्यानंतर त्यांना १३ मार्चला कस्तुरबामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

दरम्यानच्या काळात ते आपल्या पत्नी आणि मुलाच्याही संपर्कात आल्याने त्यांच्या पत्नी आणि मुलालाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे या दोघांनाही उपचारांसाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारांदरम्यान या ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या पत्नी आणि मुलाला विश्वासात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे या दोघांनीही कस्तुरबातील विलगीकरण कक्षातच त्यांचं अंतिम दर्शन घेतलं.

हेही वाचा- तारक मेहताचे चित्रीकरण सुरु राहू द्या, निर्मात्याची सरकारकडे मागणी

मृत्यू झालेल्या व्यक्तीमुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून आवश्यक काळजी घेण्याचे निर्देश डाॅक्टरांना देण्यात आले होते. त्यानुसार त्यांचा मृतदेह विशिष्ट आवरणाने झाकून ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर अत्यंत सावधगिरी बाळगून अंत्यविधी करण्यात आले.

सध्या या दोघांवरही उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठिक असल्याचं म्हटलं जात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा