तानसा पाईपलाईन मुलुंडमध्ये फुटली, हजारो लिटर पाण्याची नासाडी

Mulund West, Mumbai  -  

मुलुंडच्या इसिस रुग्णालयाच्या मागे असलेली मुंबई महापालिकेची तानसा पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. सोमवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास ही पाईपलाईन फुटली. स्थानिक रहिवाशांनी यासंदर्भात कळवल्यानंतर पालिकेच्या जल विभागाचे कर्मचारी घटनास्थळावर पोहचले. ही पाईपलाईन 72 इंचाची आहे. यामुळे मुलुंड कॉलनी, विनानगर, बीआर रोड या विभागातील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. मंगळवारी पूर्ण दिवस दुरुस्ती काम सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली आहे.

Loading Comments