Advertisement

राज्यात थंडी वाढली; तापमान ८.८ अंशांपर्यंत घसरलं

दिवाळीनंतर गायब झालेली थंडी पुन्हा परतू लागली आहे.

राज्यात थंडी वाढली; तापमान ८.८ अंशांपर्यंत घसरलं
SHARES

दिवाळीनंतर गायब झालेली थंडी पुन्हा परतू लागली आहे. राज्यभरात ८.८ अंशांपर्यंत तापमान खाली आलं होतं. राज्यभरात हिवाळ्याची चाहूल लागली आहे. परभणी कृषी विद्यापीठ ८.८, नाशिकमध्ये ११.१ डिग्री, परभणी १०.६, पुणे ११.५, सांताक्रूझ १८.४, जळगाव १२.६, बारामती ११.९, औरंगाबाद १३.०, गोंदिया १०.५, नागपूर १२.४ एवढं किमान तापमान नोंदविलं गेलं.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात थंडीची चाहूल लागली होती. मात्र, त्यानंतर अचानक तापमान वाढू लागलं होतं. मुंबईचं कमाल तापमान ३६ अंश तर किमान तापमान २५ अंशांवर गेलं होतं. तापमानातील वाढीमुळं ऐन दिवाळीत थंडी गायब झाली होती. मुंबईच्या किमान तापमानात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला चांगली घसरण झाली होती. ते १९ अंशांच्या आसपास गेलं होतं. त्यामुळं गेला आठवडाभर मुंबईत थंडी होती.

दिवाळीदरम्यान तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानुसार, तापमानात वाढ नोंदविण्यात आली. थंडीमुळं कोरोनाची पुन्हा मोठी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळं राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. 

संबंधित विषय