Advertisement

मुंबईच्या तापमानात मोठी घट


मुंबईच्या तापमानात मोठी घट
SHARES

पावसाळी वातावरणामुळे मुंबई आणि परिसरातील तापमानात गेल्या दोन-तीन दिवसांत मोठे चढ-उतार नोंदविण्यात आले आहेत. मुंबईच्या तापमानात बुधवारपाठोपाठ गुरुवारीही मोठी घट नोंदविण्यात आली. 

गुरुवारी कुलाबा इथं २५.८ तर सांताक्रूझ इथं २६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. या दोन्ही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत तापमानात ७ अंशांची घट नोंदविण्यात आली. 

बुधवारीही त्यात ८ अंशांची घट नोंदविण्यात आली होती. मंगळवारी सांताक्रूझ येथे ३३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

मुंबई शहर आणि उपनगरांतील किमान तापमानात गुरुवारी सरासरीच्या तुलनेत अनुक्रमे ४ आणि १ अंशांची घट झाली. डहाणू येथे किमान १८.६ अंश सेल्सिअस, तर कमाल २१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

मुंबईत गुरुवारी सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांत सांताक्रूझ येथे ९१.२ मिमी आणि कुलाबा येथे ९०.२ मिमी पावसाची नोंद झाली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा