Advertisement

ओलाची तीन रिक्षा, एक टेम्पो आणि दोन बाईकला धडक, 8 जण जखमी

ओलाची तीन रिक्षा, एक टेम्पो आणि दोन बाईकला धडक दिली.

ओलाची तीन रिक्षा, एक टेम्पो आणि दोन बाईकला धडक, 8 जण जखमी
SHARES

घाटकोपरच्या (Ghatkopar) सुधा पार्क परिसरात ही भीषण अपघात घडला आहे. एका ओला चालकाने (Ola driver) आठ जणांना उडवलं. ओला चालकाने तीन रिक्षा, एक टेम्पो आणि दोन बाईकला धडक दिली. जखमींमध्ये तीन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. राजू यादव असं या ओला चालकाचं नाव आहे. ओला चालक हा घाटकोपरमधील कामराजनगरमध्ये राहणारा आहे. 

आज दुपारी सुधा पार्क परिसरात गाडी चालवत असताना अचानकपणे गाडीने वेग घेतला. यावेळी रस्त्यावरील वाहनांना उडवत तो हायवेच्या दिशेने गेला. धडक दिली त्यावेळी रस्त्यावर विद्यार्थी देखील होते. यावेळी ओला चालकाने रिक्षा, टेम्पो आणि दुचाकींना धडक दिली. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत, ज्यात तीन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. 

पोलिसांनी अपघातानंतर तातडीने ओला चालक राजू यादवला ताब्यात घेतलं आहे. राजावाडी रुग्णालयात आतापर्यंत आठ जणांना उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

चालकाचं नियंत्रण सुटलं की गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाला अथवा तो नशेच्या अंमलात होता हे यासंदर्भात माहिती घेण्यासाठी पोलीस दाखल झाले आहेत. पोलिसांनी चालकाची चौकशी सुरु केली आहे.



हेही वाचा

महिलांच्या बाथरूममध्ये डोकावणाऱ्या आयआयटी बॉम्बे कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला अटक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा