Advertisement

ठाण्यातील खारेगाव उड्डाणपूल डिसेंबरमध्ये प्रवाशांसाठी होणार खुला

यासाठीच गुरुवारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेत बैठक घेतली.

ठाण्यातील खारेगाव उड्डाणपूल डिसेंबरमध्ये प्रवाशांसाठी होणार खुला
SHARES

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कळवा इथला खारेगाव उड्डाणपूल डिसेंबरच्या १५ ते २० तारखे दरम्यान कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्यात येईल, असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिलं आहे. या उड्डाणपुलाचे ९५ टक्के बांधकाम पूर्ण झालं आहे.

काही क्षुल्लक गोष्टींसाठी उड्डाणपूल खुला करण्यात येत नसल्याचं समोर येत आहे. यासाठीच गुरुवारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेत बैठक घेतली. या बैठकीला ठाण्याचे आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा आणि महापौर नरेश म्हस्के उपस्थित होते.

बैठकीदरम्यान उर्वरित ५ टक्के कामे लवकरात लवकर पूर्ण करून १५ डिसेंबर पर्यंत हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी तयार होईल असं सांगण्यात आलं आहे. तसंच उड्डाणपुलाखाली असलेले रेल्वे फाटक देखील याच काळात बंद करून पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम सुरू करण्यात येईल असंही ठरवण्यात आलं आहे.

त्यामुळे खारेगाव इथले रेल्वे फाटक बंद झाल्यास पाचव्या आणि सहाव्या मार्गाचं काम फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलं आहे.

कळवा इथल्या खारेगाव रेल्वे फाटकामुळे होत असलेला त्रास पाहून २००६ साली या ठिकाणी १ पूल बांधण्याचे ठरवले गेले. त्याला २००८ झाली ठाणे महानगरपालिकेने मंजूरी घेऊन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात केली.

मात्र त्यानंतर कळवा पूर्वेला आणि पश्चिमेला पूल ज्या ठिकाणी उतरवायचा होता, त्याजागी जमिनीचे अनेक वाद समोर आले, यातील मफतलाल कंपनीच्या जमिनीच्या वादामुळे सर्वात जास्त विलंब झाला. त्यामुळे प्रत्यक्षात हे काम २०१५ साली पूर्ण झाले.

आताच्या घडीला या उड्डाणपुलाचे जवळजवळ सर्व काम झाले आहे. मात्र कंत्राटदार आणि ठाणे महानगरपालिकेच्या वादामुळे हा उड्डाणपूल सुरू करण्यात आलेला नाही. ज्यावेळी हा उड्डाणपूल सुरू होईल, त्याच वेळी खारेगाव रेल्वे फाटक बंद करण्यात येईल आणि मध्य रेल्वेला त्यांच्या लोकल सेवा वेळेत सुरू ठेवता येतील.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा