Advertisement

अधिकृत सर्पमित्रांशी अॅपवरून करा संपर्क

शहर परिसरातील सर्पमित्रांची नोंदणी करुन 'प्राणीमित्र' अॅपच्या माध्यमातून त्यांना अधिकृत मान्यता देण्यात आल्याची माहिती ठाणे वन विभागाने दिली. या अॅपवरील अधिकृत सर्पमित्रांचीच साप पकडण्यासाठी मदत घेण्यात यावी, असं आवाहन वन विभागाने केलं आहे.

अधिकृत सर्पमित्रांशी अॅपवरून करा संपर्क
SHARES

घरात किंवा परिसरात साप निघाला की या सापाला पकडण्यासाठी सर्वात पहिल्यांदा फोन लावला जातो तो सर्पमित्रांना. सर्पमित्र येऊन हा साप पकडून घेऊन जातात. पण या सापाचं पुढं काय होतं? हा विचार आपण करत नाही. तो सर्पमित्र प्रशिक्षीत आहे का?त्याच्याकडे अधिकृत ओळखपत्र आहे का? पकडलेल्या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येतं की नाही? याच्याशी आपला काहीही संबध नसतो. त्यामुळे शहर परिसरातील सर्पमित्रांची नोंदणी करुन 'प्राणीमित्र' अॅपच्या माध्यमातून त्यांना अधिकृत मान्यता देण्यात आल्याची माहिती ठाणे वन विभागाने दिली. या अॅपवरील अधिकृत सर्पमित्रांचीच साप पकडण्यासाठी मदत घेण्यात यावी, असं आवाहन वन विभागाने केलं आहे.


ओळखपत्राचं नूतनीकरण खोळंबलं

सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्र देण्यासाठी २००९ साली ठाणे वन विभागाने सर्वात पहिल्यांदा एक परीक्षा घेतली होती. ज्याद्वारे मुंबईतील काही अनुभवी आणि परीक्षा उत्तीर्ण केलेल्या सर्पमित्रांना ओळखपत्र देण्यात आलं. मात्र हे ओळखपत्र केवळ एका वर्षासाठीच देण्यात आलं होतं. पुढे या ओळखपत्राचं नूतनीकरण करण्यात आलेलं नाही.



तस्करीत वाढ

त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये सापांच्या तस्करीत चांगलीच वाढ दिसून आली. ओळखपत्राच्या नूतनीकरणासाठी मुंबईतील महाराष्ट्र सर्पमित्र संघटनेने वनविभागाशी अनेकदा संपर्क केला. पण त्यांना सकारात्मक उत्तर मिळालं नाही. २०१५ साली पुन्हा वन विभागाने एक परीक्षा घेतली. ज्यामध्ये सर्व सर्पमित्रांची लेखी परीक्षा आणि मुलाखत घेतली. पण त्यानंतरही ओळखपत्राचा प्रश्न निकाली निघाला नाही, अशी माहिती वन्यजीव अभ्यासक सुहास पवार यांनी दिली.


आतापर्यंत ठाणे वनविभागाकडे ७० सर्पमित्रांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.या नोंदणीकृत सर्पमित्रांना ओळखपत्र न देता वनविभागाने तयार केलेल्या अॅपमध्ये त्यांच्या नावांचा समावेश करण्यात येत आहे. 'प्राणीमित्र' नावाच्या या अॅपमध्ये केवळ नोंदणी केलेल्या सर्पमित्रांचाच समावेश करण्यात येत आहे. ज्याद्वारे ते वनविभागाच्या संपर्कात राहून काम करु शकतात.
- जितेंद्र रामगावकर, वन उपसंरक्षक, ठाणे वनविभाग

20140914_172343.jpg

'इथं' संपर्क साधा

वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये विनापरवाना सापांना पकडणं, जवळ बाळगणं, तस्करी करणं, खेळ करणं गुन्हा आहे. त्याचबरोबर सापांसोबत स्टंटबाजी करणं व सोशल मीडियावर प्रसिद्ध करणं हा सुद्धा गुन्हा असून तसं आढळल्यास कडक कारवाई केली जाते. कुणी तसं करताना आढळल्यास किंवा साप व इतर वन्यजीव मानवी वस्तीत आल्यास १९२६ या नंबरवर संपर्क साधावा. संपर्क केल्यानंतर वनविभाग त्याभागातील सर्पमित्र आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवलं जाईल, अशी माहितीही रामगावकर यांनी दिली.



हेही वाचा-

जेलीफिश येतात कुठून? वाचा येथे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा