जेलीफिश येतात कुठून? वाचा येथे

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर विषारी जेलीफिश आल्याचं सागरी परिसंस्थेच्या अभ्यासकांच्या निदर्शनास आलं आहे. या जेलीफिश नावच्या विषारी जलचर प्राण्यानं मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर अनेकांना दंश केलं आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर जाण्याचा विचारात असाल तर जरा सांभाळून.

SHARE

गेल्या काही दिवसांपासून वाऱ्याचा वेग वाढल्यानं मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर विषारी जेलीफिश आल्याचं सागरी परिसंस्थेच्या अभ्यासकांच्या निदर्शनास आलं आहे. या जेलीफिश नावच्या विषारी जलचर प्राण्यानं मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर अनेकांना दंश केला आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर जाण्याचा विचारात असाल तर जरा सांभाळून.


कशा असतात या जेलीफिश?

समुद्रात किनाऱ्यांवर आढळणाऱ्या जेलीफिश लाटांवर छत्रीच्या आकाराचे दिसतात. त्यांना पोर्तुगीज मॅन ऑफ युरियन किंवा ब्ल्यू बॉटल्स असंही म्हंणतात. हे जीव विषारी असुन समुद्रात उबदार पाण्यात मोठ्या प्रमाणात आढळतात. एका वेळी एका ठिकाणी 1000 किंवा त्यापेक्षा जास्त अशा गटागटाने हे समुद्री जीव राहतात. जेलिफिश समुद्राच्या प्रवाहासोबत वाहत असतात. त्यामुळे भरती बरोबर अनेकदा ते समुद्र किनाऱ्यावर वाहून येतात.

यांचं शरीर 2 इंच एव्हढे निळ्या रंगाच्या फुग्याच्या आकाराचं असतं. त्यांना दोरीसारखे पाय असतात ज्यांचा आकार 7 इंच ते 6 फुट एवढा असू शकतो. आपल्या या पायांचा उपयोग ते मासे पकडण्यासाठी करतात. त्यातुन ते एक विषारी द्रव सोडतात ज्यामुळे समोरच्या माशाला अर्धांगवायूचा झटका येऊन त्याचा लगेच मृत्यू होतो.


विषारी डंख

या जेलीफिशने एखाद्याला डंख मारल्यास त्या ठिकाणचा भाग लाल होतो आणि तेथे 15 ते 20 मिनिटे असह्य वेदना होतात. विषाचं प्रमाण जास्त असल्यास छातीत वेदना होऊन श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो. गेल्या दोन दिवसांत मलाडच्या अक्सा बीचवर अनेकांना जेलीफिशनं दंश केला आहे. यामुळे समुद्रावर जाताना काळजी घेण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.


दंशावर उपाय

जेलीफिशचा दंश झाल्यास तो भाग व्हिनेगरने धुवून काढावा. त्यानंतर गरम पाण्यात पाय बुडवून बसावे. अधिक त्रास होत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

वातावरण बदलाचा परीणाम झाल्यामुळे असे जलचर बरेचदा किनाऱ्यावर येतात. समुद्रात प्रदूषण वाढल्यामुळे जेलीफिश मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर आल्या असण्याची शक्यता आहे. याचा अर्थ मुंबईलगतच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलं आहे. मागील दोन वर्षांपूर्वीही अशाच जेलीफिश मुंबईच्या किनाऱ्यावर आढळून आल्या होत्या.
-
नुराग कारेकर, प्राणी विशेषज्ञ (झुओलॉजिस्ट) आणि प्रकल्प संचालक नॅचरलिस्ट फाऊंडेशन, मुंबई


हेही वाचा -

मुंबईच्या चौपाट्यांवर जाताना जपून, आल्यात विषारी जेली फिश!

संबंधित विषय
ताज्या बातम्या