Advertisement

मुंबईच्या चौपाट्यांवर जाताना जपून, आल्यात विषारी जेली फिश!

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर येणाऱ्या या जेली फिश विषारी असल्याने मनुष्याला या जेली फिशने दंश केल्यास दंश केलेली जागा लाल पडून प्रचंड वेदना होतात. विषाचं प्रमाण जास्त असल्यास दंश केलेली जागा बधीर होणे किंवा बहिरेपणा येण्याची शक्यताही असते.

मुंबईच्या चौपाट्यांवर जाताना जपून, आल्यात विषारी जेली फिश!
SHARES

मुंबईतील चौपाट्यांवर जाऊन मजामस्ती करण्याच्या मूडमध्ये असाल, तर सावधान. गिरगाव आणि जुहू या शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या चौपाट्यांवर जेली फिश आढळून आल्याने समुद्रातील पाण्यात न उतरण्याचा सल्ला मत्स्य पालन विभागाने दिला आहे.


सावधानतेचा इशारा

राज्य मत्स्य पालन विभागाचे आयुक्त अरूण विधाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्रात वाहणारे वेगवान वारे आणि मोठ्या लाटांमुळे या विषारी जेली फिश पाण्यासोबत वाहून मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर येत आहेत. गिरगाव आणि जुहूच्या समुद्र किनाऱ्यांवर अशा जेली फिश आढळून आल्या आहेत.


घातक कशा?

या जेली फिश विषारी असल्याने मनुष्याला या जेली फिशने दंश केल्यास दंश केलेली जागा लाल पडून प्रचंड वेदना होतात. विषाचं प्रमाण जास्त असल्यास दंश केलेली जागा बधीर होणे किंवा बहिरेपणा येण्याची शक्यताही असते.


'या' माशांचा समावेश

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर काही ठराविक मासे प्रजनानाच्या उद्देशाने तसंच भोजनाच्या शोधातही येतात. त्यातील काही मत्स्य प्रजातींचं वजन हलकं असल्याने त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत किनाऱ्यावर येतात. यामध्ये जेली फिश, ब्ल्यू जेली, मेडोसा, पोर्तुगीज मॅन आॅफ वाॅर, पाॅर्पीटा या माशांचा समावेश आहे.


'अशी' घ्या काळजी

त्यामुळे विषारी जेली फिशच्या दंशापासून वाचायचं असल्यास सद्यस्थितीत तरी समुद्रातील पाण्यात न उतरण्याचा सल्ला मत्स्य पालन विभागाने दिला आहे. दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीला जेली फिशचा दंश झाल्यास संबंधीत व्यक्तीने घाबरून न जाता दंश झालेल्या जागेवर व्हिनेगर आणि गरम पाणी ओतावं. यामुळे दुखणं कमी व्हायला सुरूवात होते. दुखण्याची तीव्रता जास्त असल्यास त्वरीत जवळच्या डाॅक्टरकडे जावं.



हेही वाचा-

खारफुटी संवर्धनासाठी युनायटेड वे कडून विविध स्पर्धा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा