Advertisement

ठाणे : भिवंडीतील बॅग निर्मिती युनिटला भीषण आग

अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

ठाणे : भिवंडीतील बॅग निर्मिती युनिटला भीषण आग
SHARES

भिवंडीच्या ओवली व्हिलेज येथील सागर कॉम्प्लेक्समध्ये मिनी पंजाब हॉटेलजवळील बॅग बनवणाऱ्या बॅग निर्मिती युनिटला गुरुवारी भीषण आग लागली. एकाला एक लागून असलेल्या एकूण चार गोदामांना ही आग लागली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

चारही गोदामे 1+ 1 मजली आहेत. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. भिवंडी अग्निशमन दलाचे कर्मचारी एका अग्निशमन वाहनासह आणि कल्याण अग्निशमन दलाचे कर्मचारी एका अग्निशमन वाहनासह, ठाणे अग्निशमन दलाचे कर्मचारी एका जंबो पाण्याच्या टँकरसह आणि स्थानिक ५ खाजगी पाण्याचे टँकर घटनास्थळी उपस्थित आहेत. या घटनेत अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

घटनास्थळी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. भिवंडी अग्निशमन केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार वरील माहिती अपडेट करण्यात आली आहे.


(सविस्तर वृत्त लवकरच)हेही वाचा

ठाणे : विवयाना मॉलजवळ मेट्रो गर्डरची लोखंडी प्लेट पडून महिलेचा मृत्यू

आता अॅपद्वारे होणार म्हाडाच्या लॉटरीची नोंदणी, अर्जदारांना 'हे' दोन पर्याय

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा