Advertisement

ठाणेकरांसाठी खुषखबर! ५०० स्केअर फुट पर्यंतच्या घरांना करमाफी

ठाणे महापालिकेनं (TMC) ठाणेकरांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे.

ठाणेकरांसाठी खुषखबर! ५०० स्केअर फुट पर्यंतच्या घरांना करमाफी
SHARES

ठाणे महापालिकेनं (TMC) ठाणेकरांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ठाण्यात जे नागरीक ५०० स्केअर फुट पर्यंतच्या घरांमध्ये वास्तव्यास असतील त्यांच्यासाठी एक खूशखबरी आहे. या नागरिकांसाठी ठाणे महापालिकेनं करमाफी (Tax exemption) केली आहे.

ठाणे महापालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्व पक्षीयांच्या संमतीनं याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानं ठाण्यातील सर्वसामान्य कुटुंबाना मोठा दिलासा (Relief) मिळणार आहे.

निवडणुकीमध्ये आम्ही सर्व ठाणेकरांना आश्वासन दिलं होतं की, ५०० चौरस फुटांच्या घराचे टॅक्स माफ करु. याबाबत यापूर्वीच आम्ही निर्णय घेणार होतो. पण महापालिकेची कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती ढासळली होती. महसुली उत्पन्न कमी झाल्यानं आणि कोरोनाचा खर्च वाढल्यानं आम्हाला तो निर्णय तात्काळ एक ते दीड वर्षापूर्वी घेता आला नाही. पण आज आम्ही सभागृहानं हा ठराव केला आहे, असं महापौर नरेश म्हस्के म्हणाले.

तर यासाठी नगरविकास खात्याची परवानगी लागणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदेशान्वे आम्ही आज तो ठराव केला आहे. हा ठराव आम्ही शासनाकडे पाठवू. तो ठराव शासन मंजूर करेल, अशी आशा आहे. तसेच ठाणे महापालिकेच्या उत्पन्नात जे नुकसान होणार आहे त्याबाबत शासन आम्हाला मदत करेल, अशी अपेक्षा आहे, हेही त्यांनी स्पष्ट केलं.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा