ठाण्यातील कोलशेत परिसरात 20.5 एकरमध्ये भव्य सेंट्रल पार्क उभारण्यात येणार आहे. हे न्यूयॉर्कच्या आयकॉनिक ग्रँड सेंट्रल पार्क आणि लंडनच्या हाइड पार्कपासून प्रेरित आहे. भूखंड विकास प्रकल्पांतर्गत हे उद्यान ८ फेब्रुवारी रोजी नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
ठाणे महापालिकेने (TMC) विकसित केलेल्या या उद्यानाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
कोलशेतमध्ये पार्क सिटी प्रकल्प असलेल्या खाजगी विकासक कल्पतरूने विकास हक्क हस्तांतरण (TDR) च्या बदल्यात सुविधा जागा म्हणून उद्यानाची रचना आणि विकास केला. आता ही सुविधा महापालिकेकडे सुपूर्द केली आहे.
उद्यानाची वैशिष्ट्ये:
प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जाईल की नाही याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण नाही. मात्र, येत्या दोन दिवसांत होणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत अभ्यागतांच्या प्रवेश शुल्काबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
हेही वाचा