Advertisement

राणीबागेच्या विस्तारीत प्राणीसंग्रहालयाला ‘मफतलाल’चा खोडा


राणीबागेच्या विस्तारीत प्राणीसंग्रहालयाला ‘मफतलाल’चा खोडा
SHARES

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या म्हणजेच राणीबागेच्या विस्तारीत प्राणीसंग्रहालयासाठी मफतलाल मिलची सुमारे सात एकरची जागा मिळाल्याचे महापालिका प्रशासनानं जाहीर केलं अाहे. प्रत्यक्षात मात्र ही जागा अद्याप ताब्यात आलेली नाही. या जागेत इमारतीचं विकासकाम सुरू असून ही जागा अद्यापही मफतलालच्या ताब्यात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेच्या नगरसेवकानं सुधार समितीच्या बैठकीत केला. ही जागा महापालिकेच्या ताब्यात न आल्यामुळे विस्तारीत प्राणसंग्रहालयाचे काम रखडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.


प्राणीसंग्रहालयाचे काम रखडले

नगर भू क्रमांक ५९३ वरील सात एकरची ही जागा महापालिकेला मिळणार आहे. परंतु याबाबत मफतलालने न्यायालयातून स्थगिती मिळवली आहे. त्यामुळे ही जागा महापालिकेला मिळालेली नसून ही स्थगिती नेमकी कुणाच्या जागेवर आहे आणि ही जागा घेण्यास कोणत्या अडचणी येत आहेत, याची माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी रहाटे यांनी केली. ही जागा ताब्यात न आल्यामुळे विस्तारीत प्राणिसंग्रहालयाचे काम रखडले असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला असून अध्यक्षांनी त्यांचा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा