Advertisement

'मराठी अनिवार्य' करण्याचा निर्णय लांबणीवर

अमराठी चालकांनी मराठी शिकण्याची तयारी दर्शवली असून त्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे.

'मराठी अनिवार्य' करण्याचा निर्णय लांबणीवर
SHARES

1 मे पासून राबविण्यात येणाऱ्या मराठी सक्तीच्या मोहिमेबाबत आणि रिक्षा (auto) चालकांनी (drivers) पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांची भूमिका आज स्पष्ट केली आहे.

अमराठी चालकांनी मराठी शिकण्याची तयारी दर्शवली असून त्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे.

याबद्दल माहिती देताना प्रताप सरनाईक म्हणाले, "ज्या चालकांना मराठी शिकण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये जागा उपलब्ध करून दिली जाईल. त्यांना शिकवण्यासाठी पुस्तिका दिल्या जातील. राज्यातील 39 आरटीओ कार्यालयांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे.

महाराष्ट्राचे (maharashtra) परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी असे संकेत दिले आहेत की, रिक्षा आणि टॅक्सी (taxi) चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याची 1 मे ची मुदत राज्य सरकार वाढवू शकते.

सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या (RTO) अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी होणाऱ्या बैठकीनंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

रिक्षा चालकांसाठी विशेषत्वाने तयार केलेले आणि त्यांना दैनंदिन व्यवहारात उपयुक्त ठरेल असे मराठीचे व्यावहारिक ज्ञान देण्यासाठी, एक अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे.

हे प्रशिक्षण कार्यक्रम 15 ऑगस्टपासून सुरू करण्याचे नियोजित आहे. राज्यातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व चालकांसाठी मराठी भाषेतील नैपुण्य अनिवार्यच आहे, या गोष्टीचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला.



हेही वाचा

मुंबई–अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये वाढ

ठाण्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कार वॉशवर बंदी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा