Advertisement

दहिसरच्या कोविड आयसीयू केंद्रात आग, परिचारिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

वेळीच प्रसंगावधान राखून तेथील परिचारिकांनी आग विझवली. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

दहिसरच्या कोविड आयसीयू केंद्रात आग, परिचारिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली
SHARES

मुंबईच्या दहिसर Dahisar येथील कांदरपाडा परिसरातील कोविड आयसीयू सेंटरमध्ये  Covid ICU Center रुग्णावर उपचार करत असताना, अचानक रुग्णाच्या शेजारी असलेलया वैद्यकिय उपकरणात शाॅर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली. वेळीच प्रसंगावधान राखून तेथील परिचारिकांनी आग विझवली. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

हेही वाचाः- पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी ७७ नवीन कोरोना रुग्ण

दहिसर कांदरपाडा येथे कोरोना बाधितांवर उपचारासाठी पालिकेकडून १०० रुग्ण शय्या क्षमता असलेले अतिदक्षता उपचार केंद्र  आहे. या केंद्रामध्ये एका रुग्णाशेजारी असलेल्या एचएफएनसी (हाय फ्लो नोझल कॅनूला) संयंत्राने आज गुरूवारी दुपारी २ वा. अचानक शाॅर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली. त्यावेळी रुग्णाजवळ असलेल्या परिचारिका अनुपमा तिवारी यांनी क्षणार्धात संयंत्र रुग्णशय्येपासून दूर केले. संयंत्राचा वीजपुरवठा खंडीत केला. आजूबाजूच्या इतर परिचारिका, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी, वॉर्डबॉय, जतीन यांच्यासह इतर कर्मचारी यांनी जवळच उपलब्ध असलेले अग्निरोधक उपकरण (fire extinguisher) आणले आणि पेटलेले वैद्यकीय संयंत्र क्षणार्धात विझवले. प्रसंगावधान राखून आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली.

हेही वाचाः- MSRTC च्या ९८ हजार कर्मचाऱ्यांना अद्याप पगार नाही

या परिचारिका, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांचे या कामगिरीबद्दल राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासह विविध मान्यवरांनी कौतुक केले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा