Advertisement

KDMC: कल्याण-डोंबिवलीत खाटांची संख्या ४ हजारांवर

वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येकडे पाहता कल्याण-डोंबिवली महापालिके (KDMC) ने फिल्ड हाॅस्पीटल्सच्या माध्यमातून ४ हजार खाटा सज्ज ठेवल्या आहेत. या सर्व तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये आयसीयू आणि आॅक्सिजनची सुविधा करण्यात आलेली आहे.

KDMC: कल्याण-डोंबिवलीत खाटांची संख्या ४ हजारांवर
SHARES

वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येकडे पाहता कल्याण-डोंबिवली महापालिके (KDMC) ने फिल्ड हाॅस्पीटल्सच्या माध्यमातून ४ हजार खाटा सज्ज ठेवल्या आहेत. या सर्व तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये आयसीयू आणि आॅक्सिजनची सुविधा करण्यात आलेली आहे.  

कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरात बुधवार २४ जून २०२० रोजी २२६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. येथील विविध रुग्णालयांत २४१९ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असून १६८८ कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत ८५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.   

महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार शहरातील विविध खासगी रुग्णालयातील १५६ खाटा आणि ३४०० आयसोलेशन वाॅर्ड महापालिकेच्या ताब्यात आहेत. जिथं सध्या २,२३७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ३ वेगवेगळ्या ठिकाणच्या तात्पुरत्या रुग्णालयातील १,१६० खाटा आणखी उपलब्ध होणार आहेत. या खाटांपैकी ८०० खाटांना आॅक्सिजनची व्यवस्था तर ३६० आयसीयू खाटा असतील.  

हेही वाचा - एकट्या मुंबई-दिल्लीत ४० टक्के कोरोना मृत्यू

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील नोंदणीकृत खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा प्रशासनाने शासन आदेश आणि साथरोग नियंत्रण कायद्याने आपल्या अधिपत्याखाली घेतल्या आहेत. तसंच तेथील डॉक्टर, परिचारिका, साहाय्यक कर्मचारी वर्ग ताब्यात घेण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. या खाटांवर उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय सेवेचे देयक शासन दराप्रमाणे आकारण्यात येईल, असं महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे.

खासगी रुग्णालयांमधील डॉक्टरांसह इतर साहाय्यक कर्मचारी पालिका अखत्यारीतील कोरोना उपचार केंद्रात सेवेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीत वैद्यकीय संघटनेचे डॉ. प्रशांत पाटील, डॉ. वंदना धाकतोडे, डॉ. जयेश राठोड यांचा समावेश आहे. राखीव खाटांवर किती रुग्ण दररोज उपचार घेत आहेत. त्याची अद्ययावत माहिती नियंत्रक डॉक्टरांनी दररोज दर्शनी फलकावर सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० वेळेत उपलब्ध करून देणं बंधनकारक केलं आहे.

या आदेशांचं पालन न करणाऱ्या खासगी रुग्णालय चालकांवर अत्यावश्यक सेवा कायदा आणि महाराष्ट्र नर्सिंग होम कायद्याने कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील महापालिका प्रशासनाने दिला आहे.

हेही वाचा - धक्कादायक! KEM रुग्णालयात गेल्या ३६ दिवसांत ४६० कोरोना मृत्यू


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा