Advertisement

ठाण्यातील रुग्णवाहिकांची संख्या वाढणार

या निर्णयामुळे नागरिकांना खासगी रुग्णवाहिकांच्या चढ्या दरांपासून दिलासा मिळणार आहे. तातडीच्या परिस्थितीत 15 ते 20 मिनिटांत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य महापालिकेच्या आरोग्य विभागाने ठेवले आहे.

ठाण्यातील रुग्णवाहिकांची संख्या वाढणार
SHARES

वाढत्या लोकसंख्येमुळे ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिकांची टंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे (thane) महापालिकेने (thane municipal corporation) कोरोना काळातील मॉडेलप्रमाणे पुन्हा भाडेतत्त्वावर रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे नागरिकांना खासगी रुग्णवाहिकांच्या (ambulance) चढ्या दरांपासून दिलासा मिळणार आहे. तातडीच्या परिस्थितीत 15 ते 20 मिनिटांत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य महापालिकेच्या आरोग्य विभागाने ठेवले आहे.

सध्या महापालिकेकडे सहा नियमित आणि पाच कार्डियाक अशा एकूण 11 रुग्णवाहिका आहेत.

या रुग्णवाहिकांचे वय 12 ते 15 वर्षांदरम्यान असल्याने वारंवार नादुरुस्त होणे, रस्त्यावर बंद पडणे व काही वाहनांना 15 वर्षांहून अधिक वयोमान झाल्याने शहराबाहेर नेण्यास आरटीओची (RTO) परवानगी मिळत नसल्याच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

ठाणे महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या 33 आरोग्य केंद्रे, सहा प्रसूतिगृहे आणि कळवा (kalwa) येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्ण ये-जा करतात.

प्रसुतीगृहांतील महिलांना उपचारासाठी कळवा किंवा काही वेळा मुंबईतील शासकीय रुग्णालयांमध्ये हलवावे लागते. मागणीच्या तुलनेत विद्यमान ताफा अपुरा ठरत असल्याने पर्यायी उपाय म्हणून रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या सेवेअंतर्गत 24x7 हेल्पलाइन, रिअल-टाईम जीपीएस ट्रॅकिंग, संपूर्ण शहरात एकसमान दर, गंभीर रुग्णांसाठी प्राधान्य आणि कॉल केल्यानंतर 15-20 मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

शहराच्या वाढत्या गरजांनुसार रुग्णवाहिका सेवा सक्षम करण्यासाठी भाडेतत्त्व हा प्रभावी पर्याय आहे. नागरिकांना जलद सेवा देणे हे आमचे प्राधान्य आहे.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी सादर केलेल्या प्रस्तावास प्रशासकीय सभेने मंजुरी दिली आहे.

या योजनेसाठी महापालिकेला वर्षाकाठी सुमारे 3 कोटी 80 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एका नवीन रुग्णवाहिकेची खरेदी, देखभाल, विमा, आरटीओ नोंदणी, इंधन तसेच चालकांची नेमणूक यांचा एकत्रित खर्च 80 ते 85 लाख रुपये येतो.

तसेच खासगी रुग्णवाहिका भाड्याने घेतल्यास एका फेरीसाठी 5,500 ते 7,500 रुपये खर्च होतो. हा खर्च तुलनेने कमी असल्याने भाडेतत्त्वाचा पर्याय महापालिकेने स्वीकारला आहे.



हेही वाचा

मुंबई मेट्रो वनमध्ये 996 स्मार्ट लॉकरची स्थापना

वांद्रे–खारच्या काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा