Advertisement

‘द मुंबई झू’ राणी बागेची ऑनलाइन सफारी


‘द मुंबई झू’ राणी बागेची ऑनलाइन सफारी
SHARES

मुंबईतील भायखळा परिसरात असलेली राणीची बाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय आता समाजमाध्यमावर भेटीस आले आहे. प्राणिसंग्रहालयाच्या वतीने या विशेष माहितीपटांची निर्मिती करण्यात आली असून ‘द मुंबई झू’ या युट्युब वाहिनीद्वारे या सफरीत सामील होता येणार आहे.

‘व्हच्र्युअली वाइल्ड : द व्हच्र्युअल टूर ऑफ राणी बाग’ असे या मालिकेचे नाव असून या माध्यमातून राणी बागेचा १६० हून अधिक वर्षांचा इतिहास, काही महत्त्वाचे प्रसंग, किस्से, आठवणी जगासमोर येणार आहेत. या मालिकेचा पहिला भाग ‘राणी बागेचा इतिहास’ हा स्वातंत्र्यदिनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे  यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला.

या मालिकेअंतर्गत प्रत्येक महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या माहितीपटाद्वारे  प्रेक्षकांना राणी बागेतील सर्व अचंबित करणाऱ्या आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.

सध्या प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागात राणी बागेची निर्मिती, इतिहास आणि आजवर लोकांसमोर न उलगडलेल्या गोष्टी मांडल्या आहेत. तर आगामी भागातून तेथील प्राणी, पक्षी, वनस्पती, झाडे यांची माहिती, त्यांचा बागेपर्यंतचा प्रवास, त्यांच्या प्रजातींची माहिती, बागेत घडणारे काही गमतीशीर किस्से नेटकऱ्यांच्या भेटीला येणार आहे.

ऐतिहासिक वारसा जपणारी राणी बाग, पर्यटन क्षेत्रातील त्या वस्तूचे महत्त्व, आंतरराष्ट्रीय दर्जाची कार्यपद्धती, येथील नैसर्गिक संपत्ती, जैवविविधता यांची माहिती लोकांना घरबसल्या मिळावी आणि लोकांच्या मनात निसर्गाप्रति सद्भावना निर्माण व्हावी या उद्देशाने ही माहितीपट मालिका बनवण्यात आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा