
विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून होत आहे. असे असताना मुंबई (mumbai) महानगरपालिकेच्या मतदार यादीत घोळ असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. यात एकूण 1 कोटी 3 लाख मतदार आहेत.
मात्र, या मतदार यादीत (voters list) एकाच व्यक्तीचे नाव 103 वेळा असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे एकूण 4 लाख 33 हजार दुबार मतदार आहेत. तसेच त्यांची नावे एकापेक्षा अधिक वेळा आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (elections) हे मतदार एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदान करणार नाहीत, हे निवडणूक आयोगासमोर मोठे आव्हान आहे.
दरम्यान, सर्वाधिक दुबार मतदार प्रभाग क्रमांक 199 मध्ये असून येथील त्यांची संख्या 8 हजार 207 आहे. सर्वात कमी प्रभाग क्रमांक 227 मध्ये आहे. येथील संख्या 2 हजार 98 एवढी आहे.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जानेवारीच्या अखेरपर्यंत होणे अपेक्षित आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर 20 नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीनुसार मुंबईत 1 कोटी तीन लाख मतदार आहेत. मात्र, यादीत एकाच व्यक्तीचे 103 वेळा नाव मतदार यादीत असल्याचे समोर आले आहे. तब्बल 4 लाख 33 हजार नावे अनेकवेळा असल्याचे दिसून येत आहेत.
अशा मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता यावे यासाठी आयोगाच्यावतीने 27 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत घरोघरी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या जनजागृती मोहिमेत दुबार मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करावे, याची माहिती देण्यात येणार आहे.
ज्यांची नावे दुबार आहेत, अशा मतदारांशी 27 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत विशेष मोहिमेद्वारे संपर्क केला जाणार आहे.
अशा मतदारांना ‘परिशिष्ट 1’ अर्ज भरावा लागणार आहे. जे अर्ज भरणार नाहीत, त्यांच्या नावासमोर स्टार असेल. त्यामुळे अशा मतदारांचे नाव दुबार आहे, हे समजणार आहे.
मतदानाच्या दिवशी अशा मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करणार, असे हमीपत्र भरून द्यावे लागणार आहे.
हेही वाचा
