Advertisement

रेल्वेच्या 'या' कर्मचाऱ्यांची होणार थर्मल स्क्रीनिंग चाचणी

रेल्वेतील कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात येणार आहे.

रेल्वेच्या 'या' कर्मचाऱ्यांची होणार थर्मल स्क्रीनिंग चाचणी
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वे प्रशासनानं लोकल बंद केली. तसंच, रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानं देशातील रेल्वे वाहतुकही बंद करण्यात आली. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हे निर्णय घेण्यात आले आहेत. अशातच आता रेल्वेतील अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात येणार आहे. 

कोरोना व्हायरसचे संभाव्य रुग्ण ओळखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेतील अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची थर्मल स्क्रीनिंग चाचणी आरपीएफकडून करण्यात येत आहे. त्याशिवाय, मुंबई विभागात ३० ठिकाणी एकूण २४७ गाड्या आणि ६५ इंजिनांनाही पहारा दिला जात आहे. संचालन आणि वाणिज्यिक कामांसाठी बंद असलेली रेल्वे स्थानक आणि मालगाड्या चालवण्यासाठी खुली ठेवलेले स्थानकं इथही आरपीएफ कर्मचाऱ्यांकडून गस्त घालण्यात येत आहे. 

रेल्वे रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी, नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी तसेच प्रभावीपणे काम करण्यासाठी आरपीएफनं सुमारे १७ वाहनांची व्यवस्था २४ तास केली आहे. दरम्यान देशासह राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाली आहे. 



हेही वाचा -

कोरोना बराही होईल, पण ‘या’ महाभयंकर आजाराचं काय?

व्हाॅट्सअॅपवरील ‘तो’ मेसेज खोटा, रेशनसाठी कुठलाही फाॅर्म भरण्याची गरज नाही



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा