Advertisement

व्हाॅट्सअॅपवरील ‘तो’ मेसेज खोटा, रेशनसाठी कुठलाही फाॅर्म भरण्याची गरज नाही

सध्या व्हाॅट्सअॅप आणि फेसबुकवर एक फाॅर्म व्हायरल होत असून स्वस्त दरात धान्य पाहिजे असेल, तर शिधापत्र नसलेल्या व्यक्तींनी हा फाॅर्म जिल्हाधिकारी आणि तहसिलदार यांच्या नावे भरून द्यावा लागेल, असा मेसेज त्यात आहे.

व्हाॅट्सअॅपवरील ‘तो’ मेसेज खोटा, रेशनसाठी कुठलाही फाॅर्म भरण्याची गरज नाही
SHARES

देशात लाॅकडाऊन (lockdown) करण्यात आल्याने लोकांचे रोजगार ठप्प झाले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेला केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अत्यंत नाममात्र दरात अन्नधान्य (grain) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या नावे लाभार्थ्याला एक फाॅर्म भरून द्यावा लागेल, असा मेसेज तसंच संबंधित फाॅर्म (form) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फाॅर्मसंदर्भात राज्य सरकारने खुलासा केला आहे. 

 बजेट हललं

कोराेनाचा (COVID-19) प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व खासगी आस्थापना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे लहान-मोठे व्यापारी, उद्योजक, नोकरदार, कंत्राटी कर्मचारी, कामगार यांच्यासोबत शेतकरी असे समाजातील सर्व घटक सध्या घरात अडकून पडले आहेत. उद्योग-व्यवसाय सारे ठप्प असल्याने पैशांची देवाण-घेवाण थांबली आहे. बहुतांश लोकांकडे तर खर्च करण्यासाठीही पैसे नाहीत. अशा स्थितीत अनेकांना घर कसं चालवायचं? याची चिंता सतावू लागली आहे.  

हेही वाचा- चिंता नको, ६ महिने पुरेल इतका अन्नधान्यसाठा उपलब्ध- छगन भुजबळ

पुरेल इतकं धान्य

त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने राज्यातील जनतेला प्रत्येकी ७ किलो गहू २ रुपये प्रति किलो दराने तर तांदूळ (wheat and rice) ३ रुपये प्रति किलो दराने देण्याचं निश्चित केलं आहे. हे धान्य राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने देखील राज्यात पुढील ६ महिने पुरेल इतकं धान्य उपलब्ध असून जनतेला पुढील ३ महिने रेशनिंग दुकानांच्या माध्यमातून स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येईल, असं आश्वासन दिलं आहे.

 मेसेज व्हायरल

त्यातच सध्या व्हाॅट्सअॅप आणि फेसबुकवर एक फाॅर्म व्हायरल होत असून स्वस्त दरात धान्य पाहिजे असेल, तर शिधापत्र नसलेल्या व्यक्तींनी हा फाॅर्म जिल्हाधिकारी आणि तहसिलदार यांच्या नावे भरून द्यावा लागेल, असा मेसेज त्यात आहे.

काय आहे फाॅर्ममध्ये? 

सध्या कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन (lockdown) असल्यामुळे उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे. म्हणून मला अन्नधान्याची अत्यंत आवश्यकता आहे. माझ्याकडे शिधापत्रिका नाही. माझ्या कुटुंबाची माहिती खालीलप्रमाणे आहे. कृपया मला सरकारमान्य रास्तभाव धान्य दुकानाद्वारे मोफत/स्वस्त धान्य उपलब्ध करून द्यावे ही नम्र विनंती असा मजकूर या फाॅर्मवर आहे. सोबत कुटुंबातील सदस्यांची नावे भरण्यासाठी काॅलमही आहे.

परंतु हा फाॅर्म खोटा असल्याचा खुलासा राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने (food and supply department) केला आहे. रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेला नाही. नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी सोशल मीडियावरून व्हायरल कुठलाही फॉर्म भरून देऊ नये, असं आवाहनही करण्यात आलं आहे. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा