Advertisement

चिंता नको, ६ महिने पुरेल इतका अन्नधान्यसाठा उपलब्ध- छगन भुजबळ

राज्यात ६ महिने पुरेल एवढं अन्नधान्य उपलब्ध असल्याने नागरिकांनी काळजी करू नये. त्यासाठी किराणा दुकानांवर एकाचवेळी गर्दीदेखील करू नये, असं आवाहन राज्याचे अन्न नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलं.

चिंता नको, ६ महिने पुरेल इतका अन्नधान्यसाठा उपलब्ध- छगन भुजबळ
SHARES

राज्यात ६ महिने पुरेल एवढं अन्नधान्य उपलब्ध असल्याने नागरिकांनी काळजी करू नये. त्यासाठी किराणा दुकानांवर एकाचवेळी गर्दीदेखील करू नये, असं आवाहन राज्याचे अन्न नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (state food and supply minister chhagan bhujbal) यांनी केलं आहे.

अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

अन्नधान्य, भाजीपाला किंवा मटण मच्छी यासारख्या जीवनावश्यक वस्तू (essentials) मिळणारी दुकाने तसंच दवाखाने, मेडिकल आदी सेवा संचारबंदीतून वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे यासेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी शासन प्रशासनास नागरीकांनी आवश्यक ते सर्व सहकार्य करावं. त्याचप्रमाणे भाजीपाला, कांदा, बटाटा मार्केट बंद केलेले नाहीत. त्या ठिकाणी माथाडी कामगार कामावर जाणार असेल तर त्यासंबंधी पोलिसांनी सारासार विचार करून  त्यांना कामावर जाऊ देण्याचे सहकार्य पोलीस प्रशासन करेल. शेतकरी दखील थेट ग्राहकांना भाजीपाला विकू शकतात, परंतु गर्दी होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा आवश्यकतेनुसार व सातत्याने सुरू ठेवण्यासाठी पोलीस व सर्व संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या असल्याचंही भुजबळ यांनी सांगितलं.

हेही वाचा - मोदीजी ‘त्या’ ‘जन धन’ खात्यात ६ हजारांचं ‘धन’ टाका, मनसेची पंतप्रधानांकडे मागणी

दुकानांवर गर्दी करू नका

 नागरिकांनीसुद्धा संचारबंदी काळात अनावश्यक बाहेर पडू नये. तसंच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी जाताना एकाच व्यक्तिने  जावं, संबंधित दुकानांवर जास्त गर्दी होणार नाही याची काळजी देखील नागरिकांनी घ्यावी. नागरिकांनी कोरोना (coronavirus) विषाणूची भीती न बाळगता, सतर्कतेने, स्वच्छता ठेवून व एकमेकांपासून लांब राहून या परिस्थितीचा सामना करणं आवश्यक आहे.

साठेबाजांवर कारवाई

निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक संस्थांनी गर्दीच्या ठिकाणी लोकांना ठराविक अंतरावर उभं करणं, निवडक थोड्याप्रमाणात रांगा लावून देणं असं सहज स्वरूपाचे मौलिक सहकार्य केल्यास वातावरण सुरळीत होण्यास मदत होईल.

किराणा किंवा इतर जीवनावश्यक वस्तू जास्त भावाने विकल्या जाण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याबाबत नागरिकांनी जागरूक राहून संबंधित ग्राहक संरक्षण, पोलीस किंवा महसूल अशा यंत्रणांनाकडे त्वरित तक्रार करावी. जीवनावश्यक वस्तूंमध्ये मास्क आणि सॅनिटायझर (mask and sanitizer) यांचा देखील समावेश असल्याने यात काळाबाजार झाल्यास सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येईल, असंही भुजबळ यांनी सांगितलं.

हेही वाचा - अन्यथा भाजीपाला मार्केटही बंद करावं लागेल- अजित पवार


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा