Advertisement

मुंबई आणि ठाण्याकडे जाणारा 'हा' मार्ग ४ दिवस बंद, 'हे' आहेत पर्यायी मार्ग

लोखंडी गर्डर टाकण्याचे काम सुरू झाल्यामुळे मुंबईहून ठाण्याकडे जाणाऱ्या अनेक रस्त्यांची पुढील चार दिवस वाहतूक कोंडी होणार आहे.

मुंबई आणि ठाण्याकडे जाणारा 'हा' मार्ग ४ दिवस बंद, 'हे' आहेत पर्यायी मार्ग
SHARES

मुंबईकरांसाठी आणि ठाणेकरांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्ही मुंबईहून ठाण्याच्या दिशेने प्रवास करत असाल तर तुम्हाला पुढचे चार दिवस अडचणी येण्याची शक्यता आहे. कारण, मुंबईहून ठाण्याकडे जाणारा मार्ग पुढचे ४ दिवस बंद असणार आहे.

ठाणे शहरातील आनंदनगर सिग्नल ते हायपरसिटी मॉल, वाघबीळ ब्रिज, घोडबंदर रोड या ठिकाणी गरड टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकी बंद करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

यामुळे नागरिकांनी मुंबईहून ठाण्याकडे प्रवास करताना पर्यायी मार्गाने प्रवास करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीमध्ये हे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या कामामुळे वाहतुकीवरती मोठा परिणाम होणार असून याबाबतची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त दत्तात्रय कांबळे यांनी दिली आहे.

दरम्यान, मुंबई दरम्यान घोडबंद रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन इथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

जड वाहनांनादेखील बंदी घालण्यात आली असून यामुळे प्रवाशांनी कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेऊन खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे ठाण्यात प्रवेश करावा.

या सगळ्यात दरम्यान मुंब्रा कळव्यावरून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या इतर अवजड वाहनांनादेखील खारेगाव टोल नाका इथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या वाहनांना कशेळी, अंजुरफाटा मार्गे वळवावं. गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा असा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.



हेही वाचा

राज्यात पुन्हा वीज बिल आणखी महाग होण्याची शक्यता

दिवाळीनिमित्त मुंबई पोलिसांचा महत्त्वपूर्ण निर्णय, आदेशाचे पालन न केल्यास...

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा