Advertisement

दिवाळीनिमित्त मुंबई पोलिसांचा महत्त्वपूर्ण निर्णय, आदेशाचे पालन न केल्यास...

मानवी जीवन आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे.

दिवाळीनिमित्त मुंबई पोलिसांचा महत्त्वपूर्ण निर्णय, आदेशाचे पालन न केल्यास...
SHARES

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 16 ऑक्टोबर 2022 ते 14 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुंबईत कंदील (lanterns) उडवण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

तसेच चायनीज फ्लाइंग कंदीलांच्या वापर, विक्री आणि साठवणुकीवर देखील 14 नोव्हेंबरपर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईचे डीसीपी (ऑपरेशन) संजय लाटकर (Sanjay Latkar) यांनी हे आदेश जारी केले आहेत.

आकाशात कंदील उडवल्यानं मानवी जीवन आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे.

येत्या 16 ऑक्टोबरपासून मुंबईत उडत्या कंदीलांचा वापर आणि विक्री 30 दिवसांसाठी प्रतिबंधित असणार आहे. चायनीज कंदील म्हणून समजल्या जाणाऱ्या फ्लाइंग कंदीलांचा वापर, विक्री आणि साठवणुकीवर 14 नोव्हेंबरपर्यंत बंदी लागू असेल.

आदेशाचे पालन न केल्यास मुंबई पोलीस त्याच्यावर भादंवि कलम 188 अन्वये कारवाई करणार आहेत. यासोबतच मुंबई पोलिसांनी शहरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी देखील घातली आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या 'डी' कंपनीशी संबंधित पाच जणांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मंगळवारी अटक केली आहे. त्यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. यापूर्वी खंडणीच्या प्रकरणात गुंड छोटा शकीलचा मेहुणा, सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट आणि व्यापारी रियाझ भाटी यांना अटक करण्यात आली होती.



हेही वाचा

मराठी फलक नसल्याने मुंबईत ५२२ दुकानदारांना नोटीस, लवकरच...

मिठी नदीजवळ राहणाऱ्यांनो सावधान, पात्रात सापडली भली मोठी मगर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा