Advertisement

मराठी फलक नसल्याने मुंबईत ५२२ दुकानदारांना नोटीस, लवकरच...

मराठी पाट्या लावण्यास टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध मुंबई महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

मराठी फलक नसल्याने मुंबईत ५२२ दुकानदारांना नोटीस, लवकरच...
SHARES

मराठी पाट्या लावण्यास टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध मुंबई महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. सोमवारपासून कारवाईला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशीच ५२२ दुकानदारांवर नोटीस बजावण्यात आली आहे.

दुकानांवर मराठी नामफलक लावण्यासाठी चौथ्यांदा दिलेली मुदतवाढ ३० सप्टेंबर रोजी संपुष्टात आली. मात्र तरीही ४८ टक्के दुकानांच्या दर्शनी भागात मराठी भाषेत पाट्या लागलेल्या नाहीत.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सोमवारपासून दुकानदारांवर कारवाई सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात २४ विभागातील दुकानांची पाहणी करण्यात येणार आहे. दुकानांवर ठळक अक्षरात मराठी नामफलक नसल्यास दुकानदारांना सात दिवसांची नोटीस दिली जाणार आहे. या कालावधीत दुकानदारांनी फलकावर दुरुस्त न केल्यास त्यांना कायदेशीर नोटीस देऊन नियमानुसार खटला दाखल करणे, दंड वसूल करणे अशा स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे.

पहिल्या दिवशी २ हजार १५८ दुकानांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार ६३६ ठिकाणी मराठी नामफलक असल्याचे आढळून आले. उर्वरित ५२२ ठिकाणी मराठी नामफलक नसल्याचे आढळून आले. या दुकानदारांना नियमानुसार सात दिवसांची नोटीस देण्यात आली आहे. सात दिवसांत त्यांनी दुकानावर मराठी नामफलक न लावल्यास त्याच्याकडून दंड वसुली किंवा खटला दाखल केला जाणार आहे.



हेही वाचा

महाराष्ट्र सरकारकडून सणासुदीच्या आधी सावधानतेचा इशारा

मिठी नदीजवळ राहणाऱ्यांनो सावधान, पात्रात सापडली भली मोठी मगर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा