Advertisement

स्कॉर्पिअन वर्गातील तिसऱ्या आयएनएस करंज पाणबुडीचं जलावतरण


स्कॉर्पिअन वर्गातील तिसऱ्या आयएनएस करंज पाणबुडीचं जलावतरण
SHARES

स्वदेशी बनावटीच्या स्कॉर्पिअन श्रेणीतील तिसरी पाणबुडी आयएनएस 'करंज' भारतीय नौदलात दाखल झाली आहे. बुधवारी मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथून या पाणबुडीचे जलावतरण करण्यात आलं. यावेळी नौदलाचे चीफ अॅडमिरल सुनील लांबा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या 'करंज' पाणबुडीची लांबी ६७.५ मीटर, उंची १२.३ मीटर तर वजन १५६५ टन आहे. विशेष म्हणजे या पाणबुडीतून शत्रूवर अचूक मारा करणे शक्य होणार आहे.

यापूर्वी भारतीय बनावटीची स्कॉर्पिअन श्रेणीतील पहिली पाणबुडी आयएनएस कलवरी आणि दुसऱ्या पाणबुडी खंदेरीचं जलावतरण झालं आहे. मेक इन इंडियाअंतर्गत बनवण्यात येणाऱ्या सहा पाणबुड्या २०२० पर्यंत नौदलात सामील करण्याचं उद्दीष्ट आहे.


आयएनएस करंजची वैशिष्ट्ये

  • मेक इन इंडियाअंतर्गत तयार केलेली ही स्वदेशी पाणबुडी आहे
  • अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज
  • शत्रूला हेरून अचून मारा करण्याची क्षमता
  • 'करंज' टॉरपीडो आणि अँटी शिप क्षेपणास्त्रांचा माराही करू शकते
  • प्रत्येक युद्धात या पाणबुडीचा वापर केला जाऊ शकतो
  • अँटी सबमरीन वॉरफेअर आणि इंटेलिजन्सच्या कामातही याचा वापर केला जाऊ शकतो
  • या पाणबुडीतून जमिनीवरही मारा करणे शक्य

डिझेल इलेक्ट्रिक पाणबुड्यांच्या बाबतीत कलवरीचे तंत्रज्ञान जगात उत्तम समजलं जात आहे. रडारवर असतानाही याच शोध घेता येणार नाही अशी कलवरी वर्गातील पाणबुड्यांची रचना आणि तंत्रज्ञान आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा