Advertisement

रस्ते अपघातांत वर्षभरात 'इतक्या' जणांचा मृत्यू

राष्ट्रीय व राज्य महामार्गांसह अन्य रस्त्यांवर वर्ष २०२१ मध्ये २९ हजार ४९३ अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

रस्ते अपघातांत वर्षभरात 'इतक्या' जणांचा मृत्यू
SHARES

राष्ट्रीय व राज्य महामार्गांसह अन्य रस्त्यांवर वर्ष २०२१ मध्ये २९ हजार ४९३ अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी १२,५४९ अपघातांमध्ये १३ हजार ५२८ जणांचा बळी गेला. वर्ष २०१९ च्या तुलनेत रस्ते अपघातातील मृतांचा हा आकडा जास्त आहे.

राष्ट्रीय व राज्य महामार्गांव्यतिरिक्त अन्य मार्गांवरदेखील अपघात होतात. वर्ष २०२१ मध्ये राज्यभरात एकूण २९ हजार ४९३ अपघातांची नोंद झाली. यातील १२ हजार ५४९ अपघात नागरिकांच्या जिवावर बेतले, तर १० हजार ८८६ अपघातांमध्ये १६ हजार ८३ लोक गंभीर जखमी झाले.

याशिवाय ४ हजार १७ अपघातांमध्ये ६ हजार ९९४ लोक किरकोळ जखमी झाले. तसंच, २ हजार ४१ निव्वळ अपघात झाले. त्यात कोणी साधे जखमीदेखील झाले नाही. अशा प्रकारे वर्ष २०१९ च्या तुलनेत गेल्या वर्षी अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १ हजार ९५९ने जास्त होती.

रस्ते
वर्ष
एकूण अपघात
मृत्यू
राष्ट्रीय महामार्ग
2019
6501
3528

2021
7505
4079
राज्य महामार्ग
2019
5518
2971

2021
6329
3411
अन्य मार्ग
2019
12952
5070

2021
15659
6038
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा