Advertisement

यंदा सांताक्लॉज गिफ्टसोबत आणणार 'थंडी'

डिसेंबर महिन्याच्या शेवटी मात्र मुंबईत किमान तापमान खाली घसरल्यानंतर मुंबईकरांना थंडीची मजा घेता येणार आहे.

यंदा सांताक्लॉज गिफ्टसोबत आणणार 'थंडी'
SHARES

डिसेंबर महिना म्हणजे थंडीचा महिना. या महिन्यात थंडी पडत असल्यानं मुंबईकर उबदार कपडे घालून फिरताना पाहायला मिळतात. मात्र, यंदा डिसेंबर उजाडला तरी मुंबईकर उकाड्यानं हैराण झाले असून, अद्याप उबदार कपड्यांच्या खरेदीला सुरूवात झालेली नाही. विशेष म्हणजे या महिन्यात नाताळ सण असून, २५ डिसेंबर रोजी हा सण साजरा केला जात असून, यादिवशी सांताक्लॉज लहान मुलं व मोठ्यांसाठी गिफ्ट आणतो. त्याचप्रमाणं यंदा सांताक्लॉज थंडी घेऊन येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईकरांना आणखीकाही दिवस उकाड्याच्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. मात्र, डिसेंबर महिन्याच्या शेवटी मात्र मुंबईत किमान तापमान खाली घसरल्यानंतर मुंबईकरांना थंडीची मजा घेता येणार आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला म्हणजे दिवाळीआधी मुंबईचं किमान तापमान १९ अंशावर घसरलं आणि मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली होती. मात्र मुंबईकरांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. दिवाळीदरम्यान गायब झालेली थंडी आता डिसेंबरचा पहिला आठवडा उजाडला तरी परत आलेली नाही.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, इतक्यात तापमानात घट होण्याची शक्यता कमी असून, डिसेंबर महिन्याच्या शेवटी नाताळदरम्यान मुंबईत किमान तापमानात घट होणार आहे.

यंदा पावसानं मुंबईसह राज्यात धुमाकूळ घातला. पावसाळा संपतो तोच ऑक्टोबर हिटचे चटके बसणार, असे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षात ऑक्टोबर संपला तरी चटके काही बसले नाहीत. उलट नोव्हेंबर महिन्यात मुंबईचे कमाल तापमान खाली-वर झाले. किमान तापमानात फार काही बदल झाला नाही किंवा ते खाली देखील घसरले नाही. 

Read this story in English
संबंधित विषय