Advertisement

डोंगरी बाल सुधारगृहातून तीन मुली पसार


डोंगरी बाल सुधारगृहातून तीन मुली पसार
SHARES

डोंगरी बालसुधारगृहात राहणाऱ्या तीन मुली शुक्रवारी संध्याकाळी भिंतीवरून उड्या मारून पसार झाल्या. 15 फिट उंच भिंतीवरून पळ काढण्यासाठी त्यांनी टेबल आणि शिडीचा वापर केला होता. मात्र काही तासांतच या मुली पुन्हा बालसुधारगृहात परतल्या.


पुन्हा बालसुधारगृहात रवानगी

बालसुधारगृहातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी या तिन्ही मुली बालसुधारगृहातून पळाल्या होत्या. या तिघांमधील एक मुलगी आपल्या बोरीवली येथील घरी गेली होती. मात्र तीच्या कुटुंबियांनी तीला घरात घेतलं नाही. त्यामुळे त्या मुलीने स्थानिक पोलिस स्टेशन गाठल आणि आपल्याला पुन्हा बालसुधारगृहात जाण्याची इच्छा बोलून दाखल्यानंतर त्यांनी तीला पुन्हा बालसुधारगृहात पाठवलं.

वरिष्ठ निरीक्षक संदीप भागदीकर यांनी खात्री केली आहे की, या मुलींविरोधात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. तर 2018 मध्ये डोंगरी बालसुधारगृहातून मुलांनी पळ काढल्याची ही चौथी घटना आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा