Advertisement

चांदीवलीत झाड पडून तीन तरुणी जखमी


चांदीवलीत झाड पडून तीन तरुणी जखमी
SHARES

मंगळवारी सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळं चांदिवलीत सुरुचं झाड कोसळून तीन तरुणी जखमी झाल्याची घटना घडली आहे. निशा वेगडा (२५), उपर्णा, प्रियंका अशी या तरुणींची नाव असून त्या चांदिवलीतील बॉम्बे रेवास कंपनीमध्ये कामाला होत्या. कंपनीतून काही कामासाठी फॅक्टरीमध्ये जाण्यासाठी रिक्षात बसल्या असता रिक्षावर अचानक सुरुचं झाड कोसळलं.


१ तरूणी गंभीर

अंधेरीच्या चांदिवली परिसरातील ओबेरॉय गार्डनजवळील बॉम्बे रेवास कंपनीजवळ मंगळवारी संध्याकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास रिक्षावर सुरुचं झाड मुळापासून कोसळलं. त्यावेळी या रिक्षामध्ये बॉम्बे रेवास कंपनीमधील निशा, उपर्णा आणि प्रियंका होत्या. यामध्ये त्या जखमी झाल्या आहेत. या तिघींनाही जवळच्या हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये निशा गंभीर दुखापत झाली असून उपर्णा आणि प्रियंकाला किरकोळ दुखापत झाली आहे.


कांदिवलीत महिला जखमी

कांदिवलीतील चारकोपमधील सेक्टर ४ येथेही झाड कोसळून पूजा पावसकर (४०) ही महिला जखमी झाली. महिलेला फिनिक्स हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात अालं अाहे. ही घटना सायंकाळी ५.५५ वाजता घडली.



हेही वाचा -

लोकलच्या ३२२ फेऱ्या तर ११ एक्सप्रेस रद्द

फक्त दहा दिवसातच महिनाभरातील पाऊस



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा