Advertisement

लोकलच्या ३२२ फेऱ्या तर ११ एक्सप्रेस रद्द


लोकलच्या ३२२ फेऱ्या तर ११ एक्सप्रेस रद्द
SHARES

चार दिवसांपासून धो-धो बरसणाऱ्या पावसानं रेल्वे सेवेचे तीन तेरा वाजवले आहेत. पश्चिम, हार्बर आणि मध्य या तिन्ही रेल्वे मार्गांवरील रूळांवर पाणी साचल्यानं मंगळवारी सकाळपासूनच रेल्वे सेवा काही ठिकाणी विस्कळीत तर काही ठिकाणी पूर्ण ठप्प होती.

 परिणामी संध्याकाळी सात वाजेपर्यंत लोकलच्या तब्बल ३२२ फेऱ्या तर ११ एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याची नामुष्की रेल्वेवर ओढवली. यामध्ये पश्चिम रेल्वेवरील १५० फेऱ्या तर मध्य रेल्वे मार्गावरील १७२ फेऱ्यांचा समावेश अाहे. तर पश्चिम रेल्वेच्या ५० फेऱ्या उशिरानं धावत होत्या. याशिवाय ५ एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्याचीही कसरत रेल्वेला मंगळवारी करावी लागली.


भाईंदर ते विरार सेवा ठप्प

आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारीही पावसामुळं रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानं चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. अनेकांनी तर पावसाचा आणि रेल्वे सेवेचा अंदाज घेत घरीच राहणं पसंत केलं. तीच गत पुन्हा मंगळवारी. मंगळवारी रात्रभर पावसाची जोरदार बॅटींग सुरू होती आणि ती दिवसभर सुरू राहिली. 

रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळं विरार, वसई आणि नालासोपारा रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर जलमय झाले. तर नालासोपार रेल्वे स्थानकावरील रूळ पाण्याखाली गेले नि भाईंदर ते विरार सेवा बंद करावी लागली. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील भाईंदर ते चर्चगेट रेल्वे सेवा धीम्यागतीनं चालू होती.


११ एक्सप्रेस रद्द 

वांद्रे-निझामुद्दीन एक्सप्रेस, वांद्रे-निझामुद्दीन गरीब रथ, मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस, विरार-सुरत, वलसाड-वांद्रे पॅसेंजर, नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल राजधानी एक्स्प्रेस, वांद्रे-डेहराडून एक्सप्रेस, मुंबई सेंट्रल-अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस, निजामुद्दीन-वांद्रे गरीब रद्द, डेहराडून-वांद्रे एक्सप्रेस अशा ११ एक्सप्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या.


मार्ग बदलला

 पोरबंदर-सिंकदराबाद एक्सप्रेस, इंदोर एक्सप्रेस, चंदीगड संपर्क क्रांती एक्सप्रेस, निझामुद्दीन-तिरूअनंतपुरम सुपरफास्ट एक्सप्रेस आणि डेहराडून-कोचूवेली सुपरफास्ट एक्सप्रेस या पाच गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला.



हेही वाचा -

पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या ५० गाड्या रद्द

एलईडीने वाचवले म. रेल्वेचे ७.७८ कोटी



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा