Advertisement

एलईडीने वाचवले म. रेल्वेचे ७.७८ कोटी


एलईडीने वाचवले म. रेल्वेचे ७.७८ कोटी
SHARES

ऊर्जा बचतीवर भर देत मध्य रेल्वेने सर्व कार्यालयांमधे एलईडी लाइट बसवण्याचा धडाका लावला आहे. त्याआधारेच पारंपरिक विजेच्या दिव्यांऐवजी एलईडी लाइटचा वापर करून मध्य रेल्वेने आपल्या वार्षिक वीज बिलात तब्बल ७.७८ कोटी रुपयांची बचत केली आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून मिळालेल्या सूचनेनुसार मध्य रेल्वेने ३१ मार्च २०१८ अगोदरपासून सर्व स्थानकावर पारंपरिक विजेच्या दिव्यांना फाटा देत एलईडी लाईट बसवण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं.



'या' ठिकाणी लागले एलईडी लाइट

मध्य रेल्वेकडून जवळपास २५६० कार्यालयांमधे एलइडी लाइटची जोडणी करण्यात आली आहे. त्यात प्रशासनिक कार्यालय, दवाखाने, कारखाने, शाळा इत्यादींचा समावेश आहे. जवळपास ८२ हजार ४८ पारंपरिक जुने लाइट काढून त्याठिकाणी एलईडी लाइट लावण्यात आले आहेत. या बदलामुळे वर्षभरात जवळपास ७२.८८ लाख युनिट विजेची बचत होणार असल्याचं मध्य रेल्वेकडुन सांगण्यात आलं आहे.



हेही वाचा-

रेल्वे कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, परत केले साडेतीन लाख रुपये



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा