Advertisement

रेल्वे कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, परत केले साडेतीन लाख रुपये


रेल्वे कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, परत केले साडेतीन लाख रुपये
SHARES

लोकल ट्रेनमधून प्रवास करताना अनेकदा आपण घाईगडबडीत आपलं सामान, बॅग ट्रेनमध्ये विसरतो. ट्रेनमधून खाली उतरल्यावर अचानक अापल्याला सामानाची अाठवण येते. पण एकदा विसरलेली गोष्ट परत मिळत नाही, असं म्हणतात. त्यातही पैशांची बॅग असेल तर ती मिळणे अशक्यच. पण मुंबई सेंट्रल कारशेडमध्ये कार्यरत असलेल्या सतीश पवार यांना गुरुवारी संध्याकाळी लोकलमध्ये ३ लाख ५७ हजार रुपये रक्कम असलेली एक बॅग सापडली. मात्र प्रामाणिकतेचं दर्शन घडवत सतीश पवार यांनी ती बॅग मालकाच्या हाती स्वाधीन केली. पवार यांच्या या प्रामाणितकेचं कौतुक केलं जात अाहे.


नेमक काय झालं?

सतीश पवार हे गुरुवारी ५ जुलैला रात्रपाळीच्या कामासाठी माटुंग्यावरुन १०.१६ च्या लोकलनं मुंबई सेंट्रलकडे जात असताना महालक्ष्मी स्थानकात त्यांना एक बॅग रॅकवर ठेवलेली आढळली. त्यांच्या डब्यातील बहुतेक प्रवासी उतरल्यामुळे गाडी पूर्ण रिकामी झाली होती. मात्र रॅकवर ठेवलेल्या बॅगला कुणीही वाली नव्हता. आसपासच्या प्रवाशांनीही ती बॅग अापली नसल्याचे सांगितले. मुंबई सेंट्रल स्थानकात उतरून त्यांनी ती बॅग स्टेशन मास्तरकडे सुपूर्द केली.


बॅगेत दोन हजारांचं बंडल

बॅग उघडून पाहिली असता, त्यात एक डायरी अाणि २ हजारांच्या नोटांचं एक बंडल होतं. डायरीत त्यासंदर्भातील नोंदही केली होती. त्यातच असलेल्या नंबरवर फोन केला असता बोरीवलीत राहणाऱ्या देवांग शहा यांची ती बॅग असल्याचं समजलं. स्टेशन मास्तरांनी रात्री १ वाजता त्यांना मुंबई सेंट्रल स्थानकात बोलावून पैशांची बॅग सुपूर्द केली. सतीश पवार यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत अाहे. रेल्वेकडून त्यांना आणि मुंबई सेंट्रलच्या स्टेशन मास्तरांना १ हजाराचे बक्षीस देण्यात आले.


हेही वाचा -

मुंबईतील 'हे' धोकादायक पूल वाहतुकीसाठी बंद

उपनगरातील ४४५ पुलांचं आयआयटी करणार आॅडिट - रेल्वेमंत्री



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा