Advertisement

पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या ५० गाड्या रद्द


पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या ५० गाड्या रद्द
SHARES

शनिवारपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसानं सोमवारीही तुफान बॅटिंग केली. रविवारी रात्रभर मुंबईत कोसळधार सुरुच होती. सोमवारी मुंबईच्या अनेक भागात तसंच रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे तिन्ही रेल्वे मार्गांची वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली. सोमवारी संध्याकाळी पश्चिम रेल्वेच्या ५० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या तर जवळपास १०० हून जास्त फेऱ्या उशिरानं सुरू होत्या.


पहिल्याच दिवशी सुट्टी

कामाच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास अडचणीचा सामना करावा लागला. तर काहींना पहिल्याच दिवशी पावसामुळे सुट्टी मिळाली सकाळच्या सुमारास वसई, विरार, नालासोपारा रेल्वे स्थानकांवरील ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या.


रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचल्यामुळे गाड्यांची गती मंदावली होती. मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर डी. के. शर्मा यांच्यासहित रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण स्थानकापर्यंत पाहणी करण्यात आली. ठाणे, कल्याण, सीएसएमटी या स्थानकावरींल अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या. दादर, माटुंगा, गोरेगाव अशा अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर जादा क्षमतेचे पंप लावून पाण्याचा निचरा करण्यात आला.


हेही वाचा -

हवामान खात्याचा 'रेड अलर्ट', जोरदार पावसामुळे ट्रेन लेट, शाळा, काॅलेजांना सुट्टी

खूशखबर! मुंबईकरांना पाणी पुरवणारा तुळशी तलाव भरलाRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा