हवामान खात्याचा 'रेड अलर्ट', जोरदार पावसामुळे ट्रेन लेट, शाळा, काॅलेजांना सुट्टी


SHARE

मुसळधार पावसाने मुंबई महानगराला जोरदार तडाखा दिलेला असताना हवामान खात्याने मुंबईकरांना पुन्हा रेड अलर्ट दिला आहे. मुंबईसहित ठाणे, पालघर आणि उत्तर रायगडमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

जोरदार पावसामुळे राज्य शिक्षण विभागाने मुंबई महानगरातील सर्व शाळा, काॅलेजांना सुट्टी जाहीर केली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ट्विटरवर यासंदर्भातील माहिती दिली. सोबतच अकरावीच्या पहिल्या यादीतील आॅनलाइन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एका दिवसाची मुदतवाढ दिली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने देखील एमएस्सी सत्र २ आणि ४ ची प्रात्याक्षिक परीक्षा आणि एमए समाजशास्त्र सत्र ३ ची परीक्षा देखील पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे स्थानकांच्या ट्रॅकवर विविध ठिकाणी पाणी साचल्याने या तिन्ही मार्गांवरील वाहतूक २० ते २५ मिनिटे उशीराने सुरू आहे.हेही वाचा-

वसई मिठागरांत अडकलेल्या ४०० जणांची सुखरूप सुटका

पावसाचे लाइव्ह अपडेट्स पाहण्यासाठी इथं क्लिक करासंबंधित विषय
ताज्या बातम्या