Advertisement

मुंबईत मंगळवारी 'इतके' रुग्ण सापडले

मागील २४ तासांत दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईत मंगळवारी 'इतके' रुग्ण सापडले
SHARES

सोमवारी रुग्णसंख्येत कमतरता आल्यानंतर मंगळवारीही ११ हजार ६४७ नवे कोरोनाबाधित सापडल्यानं काहीसा दिलासा मुंबईकरांसह पालिका प्रशासनाला मिळाला आहे.

नुकत्याच पालिकेनं दिलेल्या आकडेवारीनुसार मागील २४ तासांत ११ हजार ६४७ नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर २ जणांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी तब्बल १४ हजार ९८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट ८७ टक्क्यांवर कायम राहिला आहे. मागील २४ तासांत दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या १६ हजार ४१३ झाली आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत होते. ज्यानंतर मागील २ ते ३ दिवसांत ही रुग्णसंख्या स्थिरावली असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मुंबईत गेल्या २४ तासात तब्बल १२० पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर एका पोलिस कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत १२६ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकूण ६४३ पोलिस कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राज्यात गेल्या २४ तासांत ३३ हजार ४७० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर दिलासादायक म्हणजे २९,६७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा ६९ लाख ५३ हजार ५१४ इतका झाला आहे. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९८ टक्के इतके आहे.



हेही वाचा

मुंबईत गेल्या २४ तासात १२० पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे - टास्क फोर्स

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा